चेन्नई (तमिळनाडू) – मद्रास उच्च न्यायालयाने तमिळनाडू राज्यातील कांचीपूरम् जिल्हाधिकार्यांना पुढील ४ आठवड्यांमध्ये सरकारी भूमीवर अवैधरित्या बांधण्यात आलेले चर्च उद्ध्वस्त करण्याचा आदेश दिला आहे. यासह विभागीय महसूल अधिकारी आणि तहसीलदार यांच्या विरोधात कर्तव्यचुकारपणा केल्याच्या संदर्भात चौकशी करण्याचा आणि त्याच्या आधारे सर्व दोषींवर दंडात्मक कारवाई करण्याचाही आदेश दिला आहे. याचिकाकर्ते एम्. मुरुगेसन यांच्याकडून प्रविष्ट करण्यात आलेल्या याचिकेवर न्यायालयाने हा आदेश दिला.
पाद्य्राने स्मशानभूमीवर बलपूर्वक बांधले चर्च !
कागदपत्रांची माहिती घेऊन आणि दोन्ही पक्षांचा युक्तीवाद ऐकल्यानंतर न्यायालयाला लक्षात आले की, पाद्री सी. साथ्रैक यांनी गावकरी आणि स्थानिक अधिकारी यांच्या विरोधानंतरही सरकारी भूमीवर असलेल्या स्मशानभूमीवर अतिक्रमण करून तेथे चर्च उभारले.