Menu Close

हिंदु धर्माचा अवमान करणार्‍यांच्या विरोधात तक्रारी दाखल करा आणि न्यायायलीन लढा द्या ! – श्री. प्रशांत संबरगी, चित्रपट निर्माते

‘हिंदु धर्माचा अपमान : मुनव्वर फारुकीचे स्वातंत्र्य ?’ या विषयावर ‘ऑनलाईन’ विशेष संवाद !

विविध कार्यक्रमांत हिंदु धर्माविषयी विनोद होत असताना तिथेच आक्षेप घेतला जात नाही. जोपर्यंत दर्शक जागरूक होत नाहीत, जागरूक हिंदू या विरोधात आवाज उठवत नाहीत, तोपर्यंत विविध कार्यक्रमांतून ‘अभिवक्ती स्वातंत्र्या’च्या नावाखाली हिंदु धर्माचा अवमान होतच राहणार. हिंदूंनी आता पुढे येऊन या विरोधात तक्रारी दाखल करून न्यायायलीन लढा दिला पाहिजे, असे आवाहन कर्नाटकातील प्रसिद्ध चित्रपट निर्माते आणि उद्योजक श्री. प्रशांत संबरगी यांनी केले. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘हिंदु धर्माचा अपमान : मुनव्वर फारुकीचे स्वातंत्र्य ?’ या विषयावर आयोजित ‘ऑनलाईन’ विशेष संवादात ते बोलत होते.

श्री. संबरगी पुढे म्हणाले, ‘या देशात हिंदु आणि मुसलमान यांच्यासाठी दोन वेगवेगळी ‘अभिव्यक्ती स्वतंत्रता’ आहेत ! ‘जगात फक्त इस्लाम धर्म आहे’ असे कट्टर मुसलमाना मानतात. जगात मोहम्मद पैगंबर किंवा इस्लामविषयी कोणीही बोलले, तर त्यांची हत्या केली जाते, घरे जाळली जातात. हिंदु धर्माचा अपमान करण्यासाठी ‘बॉलीवूड’ला मोठ्या प्रमाणात पैसा पुरवला जातो आणि या चित्रपटांतून हिंदूंचे आणि हिंदु धर्माचे चुकीचे चित्रण दाखवले जाते. या षड्यंत्राच्या विरोधातही आपण जागरूक होऊन त्याला विरोध करणे आवश्यक आहे.’

सर्वोच्च न्यायालयाच्या अधिवक्त्या मणि मित्तल म्हणाल्या, ‘मुनव्वर फारुकी अशा साखळीचा हिस्सा आहे, ज्याची सुरुवात मकबूल फिदा हुसेनपासून झाली होती. मुनव्वर फारुकी ‘कलाकारा’च्या नावावर कलंक आहे. ज्या सनातन धर्माला आपण मानत आहोत, त्याविषयी विनोद करणे, हिंदू देवीदेवतांचा अपमान करणे, हे काम ‘स्टँडअप कॉमेडी’च्या माध्यमातून केले जात आहे. हे चुकीचे असून रोखले गेले पाहिजे आणि जागृत होऊन याला विरोध होणे आवश्यक आहे. हा संवेदनशील विषय असून यांच्याविरोधात जिंकण्यासाठी लढायचे आहे. हिंदु धर्माच्या अवमानाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयीन व्यवस्थेची भूमिका कडक आणि परखड नाही, असे खेदाने म्हणावे लागत आहे’.

दिल्ली येथील उच्च न्यायालयाचे अधिवक्ता युधवीर सिंह चौहान म्हणाले, ‘तुम्ही ज्या धर्माला मानता त्याविषयी विनोद केले जातात. हिंदु देवतांचा अपमान केला जातो आणि हिंदु सहन करत आहेत. हे हिंदूंची सहनशीलता तपासत आहेत ! विनोदाच्या नावाखाली हिंदु धर्माचा अपमान करणार्‍यांच्या विरोधात ठिकठिकाणी तक्रारी दाखल होणे आवश्यक आहे. तेव्हा कुठे हिंदु धर्माचा अपमान करणार्‍यांना धडा शिकवता येईल. अल्पसंख्यांकांच्या सुरक्षेसाठी या देशात खूप कायदे आहेत, मात्र बहुसंख्य हिंदूंच्या सुरक्षेसाठी कायदे कुठे आहेत ?’

हिंदु जनजागृती समितीचे प्रवक्ता श्री. मोहन गौडा म्हणाले, ‘हिंदु धर्माचा अवमान केल्यावर आतापर्यंत संविधानिक मार्गाने हिंदूंनी विरोध केला आहे. मुनावर फारुकी, कुनाल कामरा यांनी वेगवेगळ्या कार्यक्रमांतून हिंदु धर्माचा अपमान केला आहे. हिंदु देवतांचा अपमान करणे, ही कोणती कला आहे ? जर इस्लामचा कोणी अपमान केला असता, तर देशात काय वातावरण झाले असते ? हिंदु देवतांची खिल्ली उडवणार्‍यांना कठोर शिक्षा व्हावी, यासाठी ‘ईशनिंदा विरोधी कायद्या’ची मागणी आम्ही शासनाकडे केली आहे.’

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *