अनुराग सिंह ठाकूर, केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री
पणजी – भारतीय संस्कृती आणि परंपरा यांवर आधारित चित्रपटनिर्मिती करण्यासाठी ‘नॅशनल फिल्म डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया’ (एन्.एफ्.डी.सी.) यांच्या माध्यमातून चित्रपट निर्मात्यांना साहाय्य करणार आहे. यामुळे चित्रपट निर्मात्यांना चित्रपटनिर्मितीच्या माध्यमातून अपेक्षित महसूल मिळेल कि नाही, याची काळजी रहाणार नाही. चित्रपटाच्या माध्यमातून भारतीय संस्कृती आणि परंपरा जगभर नेण्याचा हा प्रयत्न आहे, अशी माहिती केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी दिली.
५२ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते.
केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री अनुराग सिंह ठाकूर पुढे म्हणाले, ‘‘भारतात अनेक भाषा आहेत आणि यांद्वारे आम्ही जगाला आकर्षण वाटेल अशा अनेक गोष्टी दाखवू शकतो.’’