देवगड तालुका सुवर्णकार संघटनेचे ‘हलाल’ अर्थव्यवस्थेच्या विरोधात तहसीलदारांना निवेदन
Share On :
देवगड – सध्या धर्मांधांकडून प्रत्येक पदार्थ, वस्तू इस्लामनुसार वैध अर्थात् ‘हलाल प्रमाणित’ असण्याची मागणी केली जात आहे. ही मागणी केवळ मांसापुरती मर्यादित राहिली नसून धर्मांधांकडून आता धान्य, फळे, सौंदर्यप्रसाधने, औषधे आदी उत्पादनांसाठीही केली जात आहे. या ‘हलाल’ अर्थव्यवस्थेमुळे अल्पसंख्य धर्मांधांची बहुसंख्यांकांवर एक प्रकारची हुकूमशाहीच चालू आहे. त्यामुळे ‘धर्मनिरपेक्ष भारतात धर्मावर आधारित चालणारी ‘हलाल प्रमाणपत्र’ व्यवस्था तात्काळ बंद करण्यात यावी’, अशी मागणी देवगड तालुका सुवर्णकार संघटनेने निवेदनाद्वारे शासनाकडे केली आहे. याविषयी देशाचे गृहमंत्री, गृहमंत्रालयाचे सचिव, देशाचे व्यापार आणि व्यवसायमंत्री अन् सचिव यांना द्यायचे निवेदन तालुका सुवर्णकार संघटनेच्या पदाधिकार्यांनी देवगडचे तहसीलदार मारुति नाना कांबळे यांना दिले. या वेळी सुवर्णकार संघटनेचे अध्यक्ष श्री. महेश घारे, उपाध्यक्ष श्री. विवेक मोंडकर, सहसचिव श्री. संदीप तळवडेकर, सुवर्णकार श्री. संदीप कुलकर्णी, हिंदु जनजागृती समितीचे श्री. आनंद मोंडकर, श्री. अशोक करंगुटकर आदी उपस्थित होते.