देसाई केवळ तमाशा करत होत्या ! – देवेन भारती, पोलीस सहआयुक्त, मुंबई
असे आहे, तर हा तमाशा थांबवण्यासाठी पोलिसांनी तात्काळ प्रयत्न का केले नाहीत ?, याचे उत्तरही पोलिसांनी द्यावे !
मुंबई : त्या दिवशी आम्ही तृप्ती देसाई यांना परोपरीने समजावण्याचा प्रयत्न केला. तुम्हाला मुख्यमंत्र्यांना भेटता येणार नाही किंवा त्यांच्या निवासस्थानासमोर निदर्शने करता येणार नाहीत, असे सांगितले. त्यांना घरी परतण्याचा सल्लाही दिला; मात्र त्यांनी त्यास नकार दिला. अखेर नाइलाजाने त्यांना कह्यात घ्यावे लागले. देसाई या महाराष्ट्राच्या कन्हैया कुमार बनल्या आहेत, असे पोलीस उपायुक्त मनोजकुमार शर्मा यांनी म्हटले आहे.
पोलीस सहआयुक्त देवेन भारती म्हणाले, देसाईंना दर्ग्याबाहेर आंदोलन करण्याची अनुमती दिली होती; मात्र हिंसाचाराची भीती असल्याने आरंभी आम्ही त्यांना गाडीतच रोखून धरण्याचा निर्णय घेतला. त्या वेळी माघार घेणार्या देसाई काही घंट्यांनतर पुन्हा आल्या आणि त्या समुद्राजवळच ठिय्या आंदोलनाला बसल्या. त्या दर्ग्याच्या आत निदर्शने करण्याचा हट्ट करू लागल्या. पोलीस त्यांना शक्य तितके सहकार्य करत होते. शांततेने दर्ग्यात जायचे असेल, तर आम्ही संरक्षण देऊ, असेही त्यांना सांगण्यात आले; मात्र पोलीस दर्ग्यात जाऊ देत नाहीत, असे उलटे आरोप त्या आमच्यावर करू लागल्या आणि मुख्यमंत्री निवासस्थानी निदर्शने करण्याची भाषा बोलू लागल्या. त्या केवळ तमाशा करत होत्या.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात