नाशिक – जे समाजाच्या हितासाठी असते, त्याला ‘साहित्य’ म्हणतात; मात्र समाजहित साधले जात नसेल, तर त्याला मी ‘नाहित्य’ संमेलन मानतो. हे संमेलन नास्तिकवाद्यांचे आहे कि डाव्या विचारवाद्यांचे आहे ? असा प्रश्न पडतो. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात जर श्री सरस्वतीपूजन करायचे नसेल, तर यापुढे वेगळे विद्रोही साहित्य संमेलन घेणे बंद करा, असे वक्तव्य आंतरराष्ट्रीय व्याख्याते आणि इतिहासकार डॉ. सच्चिदानंद शेवडे यांनी केले. नाशिक येथे चालू असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात श्री सरस्वतीपूजन करण्याची परंपरा खंडित केल्याच्या प्रकरणी दैनिक ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीशी बोलतांना त्यांनी वरील प्रतिक्रिया व्यक्त केली.