हिंदु जनजागृती समितीच्या वतीने गुजरात राज्य, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण विभाग समन्वयक मनोज खाडये यांचे रत्नागिरी जिल्ह्यात ‘हलाल प्रमाणपत्रा’च्या जनजागृतीविषयी ठिकठिकाणी ‘संपर्क अभियान’ !
हलाल अर्थव्यवस्थेविरोधात कृतीशील होणारे व्यापारी आणि उद्योजक यांचे अभिनंदन ! – संपादक दैनिक सनातन प्रभात
रत्नागिरी (वार्ता.) – हलाल उत्पादनांतून लाभ मिळवून तो नफा इस्लामिक बँकेद्वारे उत्पादनांच्या वाढीसाठी वापरणे, इस्लामिक बँकेतून हलाल उत्पादने बनवणार्यांना आर्थिक साहाय्य उपलब्ध करून देणे आणि जागतिक स्तरावरील बाजारावर नियंत्रण मिळवण्याचा ‘हलाल प्रमाणपत्रा’द्वारे प्रयत्न करणे, हे मोठे जागतिक षड्यंत्र आहे. अशा ‘हलाल प्रमाणपत्रा’विषयी रत्नागिरी जिल्ह्यात हिंदु जनजागृती समितीचे गुजरात राज्य, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण विभाग समन्वयक श्री. मनोज खाडये यांनी ‘संपर्क अभियाना’द्वारे जागृती केली. या अभियानात उद्योजक, व्यापारी, हिंदुत्वनिष्ठ आणि धर्मप्रेमी असे समाजातील सर्व प्रकारचे घटक सहभागी झाले होते. या अभियानात ‘अनेक उद्योजक आणि व्यापारी यांनी ‘हलाल अर्थव्यवस्थे’च्या विरोधात सक्रीय सहभागी होऊ’, अशी सिद्धता दर्शवली. रत्नागिरी आणि लोटे येथील उद्योजकांच्या समवेत झालेल्या बैठकीचा वृत्तांत येथे देत आहोत. या बैठकांमध्ये हिंदु जनजागृती समितीचे श्री. विनोद गादीकर हेही उपस्थित होते.
रत्नागिरी
‘हलाल प्रमाणपत्र’ याविषयी येथील उद्योजकांची बैठक एम्.आय्.डी.सी. येथील श्री. तुषार देवळेकर यांच्या ‘वर्कशॉप’मध्ये पार पडली. या बैठकीत उद्योजकांनी व्यक्त केलेले विचार येथे देत आहोत.
अ. श्री. तुषार देवळेकर, विनस इंडस्ट्रिज, रत्नागिरी : माझ्याकडे येणार्या प्रत्येक उद्योजकाला मी याविषयी सांगीन, तसेच ५० ते ६० जणांना एकत्र करून मनोज खाडये यांचे मार्गदर्शन परत आयोजित करण्यासाठी प्रयत्न करीन.
आ. श्री. सतीश पेडणेकर, मालक, विजय इंजिनीयरिंग, रत्नागिरी : माझे ‘फूड प्रोसेसिंग’ युनिट आहे. मला या ‘हलाल सर्टिफिकेट’ची काहीच आवश्यकता नाही. या देशात ७० टक्के हिंदू आहेत. त्यामुळे माझी उत्पादने बाजारात सहज वितरण होतील, तसेच या कार्यामध्ये माझे कायमच योगदान राहील.
इ. श्री. अनिल देवळे : आमच्या फॅक्टरीत ६५ कामगार आहेत. त्यांचेही आम्ही याविषयी प्रबोधन करू, तसेच आमच्या कुटुंबात आम्ही सर्वजण प्रतिदिन रात्री अर्धा घंटा नामजप करतो. राष्ट्र आणि धर्म यांसाठी प्रत्येक रविवारी सामूहिक नामजप करतो. ‘सनातन पंचांग’ घेऊन ते आम्ही आमचा कामगार वर्ग आणि अन्य ग्राहक वर्गाला ‘विनामूल्य’ देतो. सनातनचे श्री. हरिश्चंद्र वेंगुर्लेकर हे भ्रष्ट नसलेले (नॉनकरप्ट) अधिकारी असल्याने एम्.आय्.डी.सी. भागातील उद्योजक स्थिर आहेत. ही खूप लक्षणीय गोष्ट आहे.
लोटे
येथे एम्.आय्.डी.सी. येथील सहस्र केमिकल आस्थापनाच्या ‘कॉन्फरन्स हॉल’ मध्ये उद्योजकांची बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीतून स्फूर्ती घेऊन आर्.एस्.डी. पॉलिमर प्रा.लि.चे संचालक श्री. आनंद बागवे यांनी मुंबई येथे परिचयातील उद्योजकांची बैठक आयोजित करणार. तसेच आर्थिक साहाय्यातूनही या धर्मकार्यामध्ये सहभागी होणार असल्याची इच्छा सनातनचे साधक श्री. हरिश्चंद्र वेंगुर्लेकर यांना दूरभाषवर संपर्क करून सांगितले.
योजना इंटरमिडिएट प्रा.लि. चे संचालक अधिवक्ता सिद्धार्थ अजय मेहता यांनी देहली सर्वाेच्च न्यायालयात काम करतांना सहकारी अधिवक्त्याकडून ‘हलाल’ भोजनाविषयी आलेला अनुभव बैठकीत सांगितला, तसेच हिंदु विधीज्ञ परिषदेशी संपर्क करून या कार्यात सहभागी व्हायला आवडेल, असेही ते म्हणाले. या वेळी ‘हलाल प्रमाणपत्र’ संदर्भात विचारल्या गेलेल्या काही प्रश्नांना श्री. मेहता यांनीच उस्फूर्तपणे उत्तरे दिली. हिंदु जनजागृती समितीच्या कार्यात सहभागी होण्यास इच्छुक असल्याचे त्यांनी सांगितले.