Menu Close

अमेरिकेने सातत्याने आकाशमार्गाने केलेल्या आक्रमणांमुळे इसिसचे आर्थिक कंबरडे मोडले !

आतंकवाद्यांचा निःपात करण्यासाठी अमेरिका त्यांचे अड्डे नेस्तनाबूत करते ! भारताने आतंकवाद्यांचे असेच हाल करावेत, अशी जनतेची अपेक्षा आहे !

america_vs_isis

वॉशिंग्टन : अमेरिकेने सातत्याने आकाशमार्गे आक्रमण केल्याने आतापर्यंत इसिस या आतंकवादी संघटनेची ८० कोटी डॉलर म्हणजे ५३ अब्ज १५ कोटी रुपयांची हानी झाली आहे. प्रचंड आर्थिक हानीमुळे आतंकवाद्यांकडून इसिस सोडून दुसर्‍या संघटनेत जाण्याच्या ९० टक्के घटना समोर आल्या आहेत, तसेच नवीन भरती होण्याचे प्रमाणही अल्प झाले आहे, असे अमेरिकेचे मेजर जनरल पीटर गर्स्टेन यांनी बगदाद येथे सांगितले.

१. इसिसच्या आर्थिक स्रोतांवर आकाशमार्गाने सुमारे २० आक्रमणे करण्यात आली आहेत. अमेरिकेला वाया गेलेल्या रकमेची निश्चित संख्या कशी मिळाली, याविषयी त्यांनी स्पष्ट माहिती दिलेली नाही.

२. इराकमधील एका घटनेत घरामध्ये लपवून ठेवलेली १५ अब्ज डॉलरहून अधिक रक्कम नष्ट करण्यात आली. या घरामध्ये पैसे असल्याची गुप्त माहिती मिळाली होती, तसेच ३३ अब्ज ते ५३ अब्ज डॉलर रकमेची हानी करण्यात अाल्याचाही अंदाज आहे.

३. गतवर्षी तेलाच्या विहिरींवरील आक्रमणानंतरही इसिसकडे २५ अब्ज डॉलरहून अधिक पैसा आहे, असा अंदाज आहे.

४. अमेरिकेच्या नेतृत्वाखालील सेनेने त्यांच्यावर आकाशमार्गाने आक्रमण केल्यानंतर इसिसला त्याच्या अनेक जागा आणि तेल क्षेत्रे सोडावी लागली.

५. फेब्रुवारी २०१६ मध्ये इसिसमध्ये ३१ सहस्र ५०० आतंकवादी होते. आता २५ सहस्रच राहिले आहेत, अशी माहिती व्हाईट हाऊसने दिली आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *