Menu Close

धर्मांधाने ‘राजेश यादव’ बनून हिंदु मुलीला फसवले आणि तिचे बलपूर्वक धर्मांतर करून लग्न केले !

उत्तरप्रदेश सरकारने ‘लव्ह जिहाद’ करणार्‍या धर्मांधांचीही संपत्ती कह्यात घेऊन त्यांना आजन्म कारागृहात डांबले, तरच असे अपप्रकार कुठेतरी न्यून होतील ! – संपादक दैनिक सनातन प्रभात

आरोपीने यापूर्वी ३ मुलींशी लग्न करून त्यांची फसवणूक केली !

हमीरपूर (उत्तरप्रदेश) – येथील अब्दुल मोबिन याने ‘राजेश यादव’ या नावाने मौदहा भागातील एका युवतीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले आणि तिच्यासमवेत पलायन केले. त्यानंतर त्याने युवतीचे बलपूर्वक धर्मांतर करून तिच्याशी लग्न केले. या प्रकरणी पीडितेच्या नातेवाईकांनी बजरंग दलाचे नेते आशीष सिंह यांच्या समवेत जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रार केली. पीडितेने तक्रार केल्यावर पोलिसांनी धर्मांतरविरोधी कायद्यासह अन्य कलमांतर्गत प्रकरण नोंदवले आहे.

१. पीडितेने पोलिसांना सांगितल्याप्रमाणे अब्दुल मोबिन याने ४ वर्षांपूर्वी दूरभाषच्या माध्यमातून तिच्याशी मैत्री केली. त्या वेळी त्याने त्याचे नाव ‘राजेश यादव’ सांगितले होते.

२. पुढे नंतर आरोपीने पीडितेला लग्नाचे प्रलोभन देऊन तिला पळवून नेले. तो तिला आधी बलरामपूर आणि नंतर मुंबई येथे घेऊन गेला. तेथे तिला बलपूर्वक इस्लाम स्वीकारण्यास भाग पाडले आणि तिच्याशी निकाह (मुसलमान प्रथेप्रमाणे लग्न) केला.

३. कालांतराने त्यांना एक मुलगा झाला. या काळात त्याने तिला अनेक वेळा मारहाण केली. एक दिवस तिला समजले की, अब्दुल मोबिन हा विवाहित असून त्याने यापूर्वी ३ मुलींशी लग्न केले आहे. आरोपीचे खरे स्वरूप समजल्यानंतर पीडितेने तेथून पलायन केले आणि आईकडे गेली.

४. पीडित मुलगी ४ वर्षांपूर्वी गायब झाली होती आणि तेव्हाही तिच्या नातेवाईकांनी पोलीस तक्रार केली होती; परंतु पोलीस तिचा शोध लावू शकले नव्हते. (यावरून पोलिसांची (अ)कार्यक्षमता कशी आहे ? हेच दिसून येते. पोलिसांच्या (अ)कार्यक्षमतेमुळेच जनतेचा त्यांच्यावरील विश्वास उडाला आहे, असे म्हटल्यास चुकीचे ते काय ? – संपादक दैनिक सनातन प्रभात)

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *