|
|
नवी देहली – सी.डी.एस्. अर्थात् ‘चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ’, म्हणजेच तिन्ही सैन्यदलांचे प्रमुखपद सांभाळणारे जनरल बिपीन रावत, त्यांची पत्नी आणि अन्य ११ जण यांचा तमिळनाडूतील कुन्नूर येथे हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झाल्यानंतर देश-विदेशांतून शोक व्यक्त करण्यात येत आहे; मात्र सामाजिक माध्यमांतून काही देशद्रोही, खलिस्तानवादी आणि हिंदुद्रोही यांनी जनरल रावत यांच्या मृत्यूचा आनंद व्यक्त केला. या प्रकरणी राजस्थानमधील टोंक येथून जावाद खान याला अटक करण्यात आली आहे. त्याने जनरल रावत यांचे छायाचित्र प्रसारित करत ‘नरकात जाण्यापूर्वी जिवंत जळाले’, असा मजकूर लिहिला होता.
जनरल रावत यांचा मृत्यू झाल्याचे अधिकृतरित्या घोषित करण्यापूर्वीच काही निवृत्त सैन्याधिकार्यांनी त्यांचा मृत्यू झाल्याचे ट्वीट करून सांगितले, तर अन्य काही जणांनी ‘बिपीन रावत यांच्याविषयी जे काही घडले आहे, ते त्यांच्यासाठी योग्यच होते’, अशा प्रकारचे ट्वीट केले. ट्वीट करण्यामध्ये निवृत्त लेफ्टनंट एच्.एस्. पनाग आणि निवृत्त कर्नल बलजित बक्षी यांचा समावेश होता. बक्षी यांनी म्हटले की, लोकांशी कसे वागायचे, याची कर्माची स्वतःची पद्धत असते.’ नंतर बक्षी यांनी हे ट्वीट हटवले आणि क्षमा मागितली; मात्र काही वेळात क्षमा मागणारेही ट्वीट त्यांनी हटवले. बक्षी हे स्वतंत्र खलिस्तानची मागणी करणारी बंदी घातलेली संघटना ‘सिख फॉर जस्टिस’चे समर्थन करत असतात.
रावत यांच्या मृत्यूविषयी काँग्रेसच्या मुखपत्रातील महिला पत्रकार अश्लीन मॅथ्यू यांचे ‘देवाचे नियोजन’ अशा शब्दांत ट्वीट !
काँग्रेसची मानसिकता राष्ट्रघातकीच असल्याने तिच्या मुखपत्रासाठी काम करणारे पत्रकारही अशा मानसिकतेचे असल्यास नवल ते काय ? सरकारने अशांवर कारवाई करून त्यांना कारागृहात टाकले पाहिजे ! – संपादक दैनिक सनातन प्रभात
काँग्रेसचे मुखपत्र असलेल्या ‘नॅशनल हेरॉल्ड’ या दैनिकाच्या महिला पत्रकार अश्लीन मॅथ्यू यांनीही ट्वीट करत ‘देवाचे नियोजन’ असे लिहिले होते. त्याला विरोध करण्यात आल्यावर तिने हे ट्वीट हटवले आणि क्षमा मागितली; मात्र लोकांनी क्षमा स्वीकार करण्यास नकार दिला.
(म्हणे) ‘…आता अजित डोवाल यांचा क्रमांक !’ – गुजरातमधील शिवाभाई अहीर याची फेसबूक पोस्ट
गुजरात येथील शिवाभाई अहीर याने फेसबूकवर पोस्ट करतांना म्हटले आहे, ‘पुलवामाद्रोही मनोहर पर्रीकर, जनरल बिपीन रावत यांच्यानंतर आता राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांचा क्रमांक आहे.’ याविरोधात भाजपच्या नेत्याने कारवाई करण्याची मागणी केली आहे.