अखिल भारत हिंदु महासभेने जिल्हाधिकार्यांकडे केली होती मागणी
उत्तरप्रदेशमध्ये भाजपचे सरकार असतांना अशी अनुमती हिंदूंना मिळाली पाहिजे, असेच हिंदूंना वाटते ! – संपादक दैनिक सनातन प्रभात
मथुरा (उत्तरप्रदेश) – अखिल भारत हिंदु महासभेने येथील श्रीकृष्णजन्मभूमीवर असलेल्या ईदगाह परिसरामध्ये १० डिसेंबर या दिवशी भगवान श्रीकृष्णाची आरती करण्याची अनुमती जिल्हाधिकार्यांकडे मागितली होती; मात्र प्रशासनाने ती नाकारली आहे.
१. जिल्हाधिकारी नवनीत सिंह चहल यांनी म्हटले की, आरतीसाठी अनुमती देण्यात आलेली नाही; कारण यामुळे एक नवीन परंपरा निर्माण होऊ शकते. या प्रकरणी प्रशासन सतर्क आहे. येथील शांतता बिघडवण्याचा प्रयत्न केल्यास कारवाई केली जाईल.
मथुरा: हिंदू महासभा ने भगवान कृष्ण की आरती की अनुमति के लिए फिर की अपील, प्रशासन सतर्क #Mathura https://t.co/f4K7nYCCFG
— आउटलुक (@outlookhindi) December 10, 2021
२. हिंदु महासभेच्या राष्ट्रीय अध्यक्षा राज्यश्री चौधरी यांनी एक दिवस आधी म्हटले होते की, आम्ही जिल्हा प्रशासनाला ७ डिसेंबर या दिवशी पत्र पाठवले आहे; मात्र अद्याप कोणतेही उत्तर मिळालेले नाही. अनुमतीविना आम्ही आरती करणार नाही. जर आम्हाला अनुमती दिली नाही, तर स्वतः प्रशासनाने तेथे आरती करावी आणि त्याचा व्हिडिओ आम्हाला पाठवावा.
३. यापूर्वी महासभेने ६ डिसेंबर या दिवशी ईदगाह मशिदीमध्ये भगवान श्रीकृष्णाची मूर्ती स्थापित करून तेथे जलाभिषेक करण्याची घोषणा केली होती; मात्र पोलिसांनी त्यांच्या पदाधिकार्यांना घरात नजरकैद केल्याने आणि प्रचंड बंदोबस्त ठेवल्याने या संघटनेने ही घोषणा मागे घेतली होती.