गेल्या २ मासांपासून या संदर्भात हिंदू आणि त्यांच्या संघटना यांनी गुरुग्राम येथे केलेल्या आंदोलनामुळे आता ही भूमिका घेण्यात आली आहे. ती हिंदूंना आंदोलन करण्यापूर्वीच घेतली गेली पाहिजे होती, असेच हिंदूंना वाटते ! – संपादक दैनिक सनातन प्रभात
डावीकडे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर
गुरुग्राम (हरियाणा) – सार्वजनिक जागांवर नमाजपठण करण्याची प्रथा खपवून घेतली जाणार नाही; पण चर्चेतून एक सौहार्दपूर्ण तोडगा काढला जाईल, अशी चेतावणी राज्यातील भाजप सरकारचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी दिली. गुरुग्राममध्ये सार्वजनिक जागांवर नमाजपठण करण्याच्या विरोधात २ मासांपूर्वी हिंदूंनी निदर्शने चालू केल्यानंतर प्रथमच भाजप सरकारची भूमिका मुख्यमंत्री खट्टर यांनी स्पष्ट केली आहे. गेल्या २ मासांपासून प्रत्येक शुक्रवारी नमाजपठण करण्याच्या विरोधात निदर्शने आयोजित केली जात आहेत. त्यामुळे नमाजपठणाच्या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येत आहे. आंदोलकांना दोनदा कह्यात घेण्यात आले आहे. हिंदूंच्या संघटनांकडून नमाजपठणाच्या ठिकाणी भजन, हवन आणि पूजा करण्यात आली आहे.
१. शासकीय विश्रामगृहात पत्रकारांशी बोलतांना खट्टर म्हणाले, ‘‘कुणी पूजा-अर्चा करत असेल, तर आम्हाला काही अडचण नाही. धार्मिक स्थळे याच कारणासाठी बनवली जातात. तथापि उघड्यावर किंवा सार्वजनिक ठिकाणी उपासना होऊ शकत नाही. यापूर्वी नमाजपठणाविषयी काही निर्णय घेण्यात आले होते; परंतु आता ते मागे घेण्यात आले आहेत. याविषयावर पुन्हा चर्चा केली जाईल. आम्ही कोणत्याही परिस्थितीत संघर्ष होऊ देणार नाही. कुणाच्याही अधिकारांत कुणीही ढवळाढवळ करू नये. कुणालाही बळजोरी करू दिले जाणार नाही.’’
२. मुसलमान समाजाकडे मोठ्या प्रमाणात भूमी आहे. तेथे त्यांना नमाजपठणाची अनुमती दिली पाहिजे. काही भूमी अशी आहे, जी मुसलमानांची किंवा त्यांच्या ‘वक्फ बोर्डा’ची असून त्याविषयी कोणताही वाद नाही. त्यांना अशी भूमी उपलब्ध करण्यात यावी किंवा त्यांनी घरातच नमाजपठण करावे. सार्वजनिक ठिकाणी येऊन नमाजपठण करून वाद होऊ दिला जाणार नाही. मुसलमानांशी चर्चा करून यावर तोडगा काढला जाईल.
३. वर्ष २०१८ मध्ये अशाच प्रकारच्या सूत्रांवर खट्टर यांनी ‘मशिदी, इदगाह किंवा खासगी जागेत नमाजपठण केले पाहिजे’, असे म्हटले होते.