उज्जैन सिंहस्थ पर्वक्षेत्री सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समितीचे प्रदर्शन
उज्जैन : हिंदु राष्ट्र येणार; मात्र त्यासाठी थोडा संघर्ष करावा लागणार. हल्लीचे शासन अमरनाथ यात्रेत जाणार्या संतांकडून जागेचा कर घेते, तर मुसलमानांना हज यात्रेसाठी अनुदान देते. अमरनाथ येथे हिंदु संतांनी जाऊन धर्मप्रसार करणे, भंडारा करणे हे शासनाला खपत नाही. या अपप्रकारांमुळे लवकरच युद्ध होणार आहे. हिंदूंना एकत्रित आणण्यासाठी हिंदु जनजागृती समितीचे सिद्धांत आणि करत असलेला प्रसार चांगला आहे. त्याला आमचे समर्थन आहे. सेवेत कार्यरत संत आणि साधक हे सर्व पूर्ण समर्पित आहेत, हे सर्वांत महत्त्वाचे आहे. देवाच्या कृपेमुळे तुमच्याशी भेट झाली, असे प्रतिपादन होशियारपूर (पंजाब) येथील प.पू. स्वामी श्री अवधूतानंदजी महाराज परमहंस यांनी केले. सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने उज्जैन सिंहस्थ पर्वक्षेत्री लावण्यात आलेल्या प्रदर्शनाला भेट दिल्यानंतर ते बोलत होते. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक पू. डॉ. चारुदत्त पिंगळे यांच्या हस्ते पुष्पहार आणि श्रीफळ देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.
क्षणचित्रे
१. प.पू स्वामी अवधूतानंद महाराजांचे संध्याकाळी येण्याचे नियोजन होते; परंतु अन्य कार्यक्रमात व्यस्त झाल्याने त्यांनी उशीर झाल्यासाठी खेद व्यक्त केला आणि एवढ्या उशिरा ही प्रदर्शनातील माहिती मिळाली म्हणून कृतज्ञता व्यक्त केली.
२. महाराजांना डोळ्यांनी पहाता येत नाही, तरी त्यांनी जिज्ञासेने पूर्ण प्रदर्शनाची माहिती एकून घेतली.
३. महाराजांना सनातनची सात्त्विक उत्पादने दाखवल्यावर त्यांनी साबण आणि अत्तर खूप चांगले आहे, असे सांगितले.
४. सन्मान झाल्यावर महाराजांनी साधकांना प्रसाद दिला.
५. सनातनची ग्रंथसंपदा बघून महाराज पुष्कळ प्रभावित झाले. त्यांनी हिंदी भाषेतील सर्व ग्रंथांची सूची पहायला मागितली.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात