Menu Close

हिंदु राष्ट्रासाठी संघटित होणे हीच काळाची आवश्यकता ! – ह.भ.प. मारुति महाराज तुणतुणे, राष्ट्रीय वारकरी परिषद

पू. ह.भ.प. वक्ते महाराज यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त लोणी (जिल्हा नगर) येथे वारकरी अधिवेशन संपन्न

डावीकडून कु. प्रतीक्षा कोरगावकर, ह.भ.प. महाले महाराज, श्री. रामेश्वर भुकन, ह.भ.प. भगवान महाराज कोकरे, ह.भ.प. मारुति महाराज तुणतुणे, ह.भ.प. बापू महाराज रावकर, श्री. भरत निमसे, श्री. विराट पुरोहित

लोणी (जिल्हा नगर) – पू.  ह.भ.प. वक्ते महाराजांनी (पू. वक्तेबाबा) हिंदु धर्मावर होणारे वैचारिक आघात रोखण्यासाठी नेहमी परखड भूमिका घेतली. संत तुकाराम महाराज यांच्या सदेह वैकुंठगमनाचा विषय असो किंवा प्रभु श्रीराम यांच्यावर झालेले ७११ आरोप असोत, अशा अनेक आरोपांना त्यांनी सप्रमाण संदर्भ देऊन खंडण केलेले आहे. सर्वांनी हिंदु धर्मासाठी आणि हिंदु राष्ट्रासाठी संघटित होऊन कार्य करणे, हेच ह.भ.प. पू. वक्तेबाबांना अपेक्षित आहे, असे मार्गदर्शन नगर जिल्ह्यातील लोणी येथे झालेल्या वारकरी अधिवेशनात ह.भ.प. मारुति महाराज तुणतुणे शास्त्री यांनी मांडले.

या अधिवेशनाचे आयोजन राष्ट्रीय वारकरी परिषदेचे राज्य प्रचार प्रमुख ह.भ.प. वेणुनाथ महाराज विखे यांनी नगर राष्ट्रीय वारकरी परिषद परिवार यांच्या सहकार्याने केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ह.भ.प. पुरुषोत्तम महाराज भागवत यांनी केले.

आपण भगवान श्रीकृष्णाच्या बाजूने असल्यामुळे आपला विजय निश्चित आहे ! – ह.भ.प. भगवान महाराज कोकरे

पांडव पाचच होते; पण १०० कौरवांच्या विरोधात ते विजयी झाले, तसेच आपण संख्येने अल्प असलो, तरी आपला विजय निश्चित आहे; कारण आपण भगवान श्रीकृष्णाच्या बाजूने आहोत. जेव्हा एक मराठी माणूस अर्थात् बाजीप्रभू पेटून उठतो, तेव्हा २५० मोगलांना संपवतो. हा आपला इतिहास आहे; म्हणून आपण हिंदु राष्ट्रासाठी कृतीशील होणे आवश्यक आहे.

सर्व समस्यांवर एक उपाय म्हणजे हिंदु राष्ट्र ! – रामेश्वर भुकन, सनातन संस्था

लव्ह जिहाद, गोहत्या, साधूसंतांची हत्या, हिंदुत्वनिष्ठांची हत्या या आणि यांसारख्या अनेक समस्यांवर एकमेव उपाय म्हणजे हिंदु राष्ट्र होय. ८० कोटी हिंदूंचे एकही हिंदु राष्ट्र नाही; म्हणून हिंदु राष्ट्र आवश्यक आहे.

धर्मांतर, लव्ह जिहाद थांबण्यासाठी धर्मशिक्षण आणि धर्माचरण आवश्यक ! – प्रतिक्षा कोरगावकर, हिंदु जनजागृती समिती

आज आपल्याकडे धर्मांतर पुष्कळ मोठ्या प्रमाणामध्ये वाढले आहे. नगरमध्ये ही समस्या पुष्कळ गंभीर आहे. लव्ह जिहादमध्ये हिंदु मुलींना फसवले जाते. धर्मशिक्षणाच्या अभावामुळे हिंदूंची स्थिती अशी आहे. हे सर्व थांबवण्यासाठी हिंदूंनी धर्म समजून घेऊन त्याप्रमाणे आचरण करायला हवे.

अधिवेशनात करण्यात आलेले ठराव

अधिवेशनाच्या शेवटी राष्ट्रीय वारकरी परिषदेचे कार्याध्यक्ष ह.भ.प. बापू महाराज रावकर यांनी खालील ठरावांची घोषणा केली. त्याला उपस्थितांनी ‘हर हर महादेव’च्या घोषात अनुमोदन दिले.

१. धर्मांतरणबंदी कायदा त्वरित लागू करावा

२. लोकसंख्या नियंत्रण कायदा त्वरित लागू करावा

३. विविध माध्यमांतून होत असलेले हिंदु धर्म, देवता, संत, गोमाता यांचे होणारे विडंबन, अपमान, टिंगल-टवाळी करणार्‍यांविरुद्ध शासनाने कठोर कायदा करावा.

४. गायरान भूमीवरील अतिक्रमण हटवून त्या भूमी गोमातेसाठी संरक्षित कराव्यात

५. हिंदुत्वनिष्ठ आणि वारकरी यांना नाहक त्रास देणारा ॲट्रॉसिटी कायदा कायमस्वरूपी रहित करावा

६. ‘हलाल’द्वारे धर्मांध आर्थिक सुबत्ता निर्माण करू पहात आहेत, त्यावर बंदी आणावी

७. गोवंश हत्याबंदी कायदा कडक स्वरूपात लागू करण्यात यावा. शाळा-महाविद्यालयात भगवद्गीता, रामायण इत्यादींचे धर्मशिक्षण हिंदूंना देण्यात यावे

८. सैन्यदलप्रमुख बिपीन रावत आणि त्यांचे सहकारी यांचा हेलिकॉप्टर दुर्घटनेत मृत्यू झाल्यानंतर आनंद व्यक्त करणार्‍यांवर देशद्रोहाचा गुन्हा नोंद करावा

सनातन संस्था म्हणजे भगवंताने पृथ्वीवर उघडलेले कार्यालय ! – ह.भ.प. भगवान महाराज कोकरे, महाराष्ट्र वारकरी परिषद महामंडळ, कोकण अध्यक्ष

सनातन संस्थेविषयी काढलेले गौरवोद्गार

सनातन संस्थेच्या ठिकाणी सांप्रदायिक वाद नाही. कुठलाही जातीभेद नाही. जगाच्या पाठीवरील कोणत्याही हिंदूवर अन्याय झाला, तरी सनातन संस्था त्याला साहाय्य करते. मग तो बांगलादेशमधील हिंदू असो किंवा अमेरिकेतील हिंदू असो ! तो सनातन हिंदु परंपरेला मानणारा असेल, तर तो आपलाच आहे, असा विचार करून साहाय्य करणारी सनातन संस्था आहे आणि म्हणूनच सनातन संस्था म्हणजे भगवंताने पृथ्वीवर उघडलेले कार्यालय आहे.

कार्यक्रमाला उपस्थित मान्यवर

श्री. विराट पुरोहित आणि श्री. भरत निमसे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, मानव सुरक्षा सेवा संघ महाराष्ट्र राज्य अध्यक्ष श्री. राजेंद्र गिरी, विश्व हिंदु परिषदेचे श्री. गोपाळ राठी, ह.भ.प. संदीप महाराज खेचरे, ह.भ.प. क्षीरसागर महाराज धर्माचार्य

विशेष

कार्यक्रमस्थळी लावलेल्या सनातन संस्थेच्या प्रदर्शनाला उपस्थितांनी उत्साहाने भेट दिली, तसेच कार्यक्रमानंतर हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या प्रमुखांनी स्थानिक समस्यांवर चर्चा करण्यासाठी बैठकीचे आयोजन केले.

ह.भ.प. भगवान महाराज कोकरे यांनी पू. वक्ते महाराज यांचे उत्तराधिकारी म्हणून ह.भ.प. मारुति महाराज तुणतुणे यांचे नाव घोषित केले.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *