Menu Close

नोएडा (उत्तरप्रदेश) येथे सार्वजनिक ठिकाणी नमाजपठणाला शेकडोंच्या संख्येने आलेल्यांना पोलिसांनी हाकलून लावले !

विनाअनुमती सार्वजनिक ठिकाणी शेकडोंच्या संख्येने लोक कशी काय येतात ? त्यांच्यावर पोलिसांचा वचक नाही का ? – संपादक दैनिक सनातन प्रभात

नोएडा (उत्तरप्रदेश) – देहली आणि एन्.सी.आर्. (राष्ट्रीय राजधानी परिसर) येथेही आता मशिदींऐवजी सार्वजनिक ठिकाणी नमाजपठण करण्याच्या घटना वाढत आहेत. हरियाणातील गुरुग्राम येथे गेल्या काही मासांपासून सार्वजनिक नमाजपठणाला विरोध होत आहे. आता उत्तरप्रदेशातील नोएडा येथेही सार्वजनिक ठिकाणी नमाजपठण करण्याचे प्रकरण समोर आले आहे. नोएडाच्या सेक्टर-५४ मधील खरगोश पार्कमध्ये शुक्रवार, १० डिसेंबर या दिवशी आलेल्या शेकडो मुसलमानांना पोलिसांनी हाकलून लावले. हे मुसलमान येथील एका कारखान्यांमधील कामगार आहेत.

पोलिसांनी सांगितले की, जिल्ह्यामध्ये कलम १४४ (जमावबंदी) लागू आहे. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी सामूहिकरित्या कोणतीही कृती करण्याची अनुमती देता येऊ शकत नाही.

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *