Menu Close

गया (बिहार) येथे हिंदुद्वेष्ट्या शिक्षिकेने श्रीमद्भगवद्गीता आणि जपमाळ कचरापेटीत फेकली !

प्रतिकात्मक छायाचित्र

गया (बिहार) – विद्यार्थ्यांचा दप्तरांची तपासणी करतांना एका शिक्षिकेने माझ्या दप्तरातील श्रीमद्भगवद्गीता आणि जपमाळ कचरापेटीत फेकून दिली, असा आरोप येथील बागेश्‍वरी मार्गावर असलेल्या ‘केंद्रीय विद्यालय-१’ मधील विद्यार्थ्याने केला. एका स्थानिक हिंदुत्वनिष्ठ संघटनेच्या कार्यकर्त्याने या मुलाशी चर्चा करून त्याची चित्रफीत बनवून ती सामाजिक माध्यमांवर प्रसारित केली. यानंतर पाटलीपुत्र (पाटणा) विभागीय कार्यालयाला सूचना देण्यात आली असून तेथील एक चमू अन्वेषणासाठी पाठवण्यात आला आहे.

१. संबंधित चित्रफितीमध्ये सदर विद्यार्थी म्हणाला की, मी माझ्या दप्तरात नेहमी श्रीमद्भगवद्गीता आणि जपमाळ असते. २ दिवसांपूर्वी माझ्या शिक्षिकेने सर्व मुलांची दप्तरे तपासली. तेव्हा त्यांना माझ्या दप्तरात श्रीमद्भगवद्गीता आणि जपमाळ आढळून आली. हे पाहून शिक्षिका संतापल्या आणि त्यांनी श्रीमद्भगवद्गीता अन् जपमाळ कचरापेटीत फेकून दिली. मुलाच्या मते ही शिक्षिका दुसर्‍या पंथाची आहे.

२. ही चित्रफीत समोर आल्यानंतर या विद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या आमना खातून म्हणाल्या की, ज्येष्ठ अधिकारी या घटनेचे अन्वेषण करत असून संबंधितांवर कारवाई करण्यात येईल.

३. या घटनेविषयी इस्कॉन मंदिराचे अध्यक्ष जगदीश श्यामदास म्हणाले, ‘‘केंद्रीय विद्यालयाच्या क्रमांक-१ मध्ये मागील अनेक दिवसांपासून शिखा आणि कपाळावर टिळा लावण्यावरून विद्यार्थ्यांचा मानसिक छळ करण्यात येत होता. नुकतेच सनातन धर्माचा महान ग्रंथ या विद्यालयामध्ये कचरापेटीत फेकून देण्यात आला. ज्या विद्यार्थ्यासमवेत ही घटना घडली, तो इस्कॉनचा सेवक आहे.’’

तक्रार स्वीकारण्यास पोलिसांचा नकार !

असा प्रकार जर अन्य पंथियांच्या संदर्भात झाला असता, तर पोलिसांनी अशीच भूमिका घेतली असती का ? अशा कर्तव्यचुकार पोलिसांना सरकारने आजन्म कारागृहात टाकावे, अशी हिंदूंची मागणी आहे ! – संपादक दैनिक सनातन प्रभात 

सदर विद्यार्थ्याचे वडील म्हणाले की, अशा प्रकारे हिंदूंच्या धर्मग्रंथांचा घोर अपमान करणार्‍यांच्या विरोधात तक्रार करण्यासाठी मी डेल्हा पोलीस ठाण्यात तक्रार गेलो; परंतु पोलिसांनी तक्रार स्वीकारण्यास नकार दिला. यानंतर मी अप्पर पोलीस अधीक्षकांशी बोलून तक्रार करण्याचा प्रयत्न केला; परंतु तेथेही तक्रार स्वीकारण्यात आली नाही.

शिक्षिकेवर कारवाई न झाल्यास आंदोलन करू ! – इस्कॉन

पत्रकार परिषदेत इस्कॉन मंदिराचे व्यवस्थापक व पीडित विद्यार्थी

श्रीमद्भगवद्गीता आणि जपमाळ कचरापेटीत फेकून देणार्‍या शिक्षिकेवर कठोर कारवाई झाली पाहिजे अन्यथा हिंदुत्वनिष्ठ संघटनांसमवेत रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यात येईल, अशी चेतावणी शहराच्या रेडक्रॉस येथील इस्कॉन मंदिरात झालेल्या पत्रकार परिषदेत मंदिराचे व्यवस्थापक जगदीश श्याम दासजी महाराज यांनी दिली. ते पुढे म्हणाले की, केंद्रीय विद्यालयील सदर विद्यार्थी मानस चौहान हा राहुल सिंह यांचा मुलगा आहे. राहुल सिंह हे फार पूर्वीपासून इस्कॉनशी जोडलेले असून श्रीकृष्णाचे भक्त आहेत. त्यांनी त्याच्या मुलावरही सनातन धर्माचे संस्कार केले आहेत.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *