Menu Close

श्रीयंत्राची निर्मिती मानवी नसून परग्रहवासियांची असल्याचा एलियनवादी संशोधकांचा दावा !

अमेरिकेच्या कोरड्या सरोवरात श्रीयंत्राची रहस्यमय निर्मिती !

shriyantra

न्यूयॉर्क : हिंदु धर्मात श्रीयंत्राला एक वेगळे महत्त्व आहे. देवीचे भक्त, योगी आदी या श्रीयंत्राची पूजा करत असतात, तसेच अनेक हिंदूंच्या देवघरात श्रीयंत्राचे पूजन केले जाते; परंतु असे हे श्रीयंत्र वर्ष १९९० मध्ये अमेरिकेतील ओरेगॉनच्या कोरड्या सरोवरात गूढपणे निर्माण झाले. तेव्हापासून या श्रींयंत्राविषयीचे रहस्य आजतागायत कायम आहे. १० ऑगस्ट १९९० मध्ये इहाडो एअर नॅशनल गार्डचा पायलट बिल मिलर प्रशिक्षण करत होता. त्या वेळी अचानक त्याची दृष्टी ओरेगॉनमधील कोरड्या पडलेल्या सरोवराकडे गेली. तेथे त्याने एक अनोखी आकृती उमटलेली पाहिली. अर्ध्या घंट्यापूर्वी तो तेथून जात असतांना त्याठिकाणी काहीही नव्हते; परंतु अर्ध्या घंट्यात आखीवरेखीव, प्रमाणबद्ध आणि विशाल अशी १३ मैल लांबीची ही आकृती निर्माण झाली. त्यानंतर त्याने याची माहिती त्याच्या वरिष्ठांना दिली. या संदर्भातील बातमी प्रसिद्ध झाल्यावर हे हिंदूंच्या पूजेतील श्रीयंत्र असल्याचे निष्पन्न झाले.

परग्रहवासियांकडून श्रीयंत्राची निर्मिती ?

हे श्रीयंत्र साध्या कागदावरही सिद्ध करायचे असेल, तर ते सहजसोपे काम नाही. अशा स्थितीत भूमीवर इतक्या अचूकतेने आणि मोठ्या प्रमाणात हे यंत्र निर्माण होणे, हे अतिशय कठीण असल्याचे तेथील प्रसिद्ध वास्तुविशारद आणि अभियंते यांनी म्हटले आहे. हे यंत्र संपूर्णपणे पहाण्यासाठी आकाशातच जावे लागते, इतके ते मोठे आहे. डोन न्यूमन आणि अ‍ॅलन डेकर या अमेरिकेतील एलियनवादी संशोधकांनी हे मानवी काम नसून परग्रहवासियांचे असल्याचे म्हटले आहे !

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात 

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *