हिंदु जनजागृती समितीची ‘हलाल सर्टिफिकेशन’ विषयीची जागृती कौतुकास्पद ! – पू. कालीचरण महाराज December 15, 2021 Share On : पू. कालीचरण महाराज यांना ‘सनातन पंचांग-२०२२’ भेट देऊन त्यांचे आशीर्वाद घेतांना (डावीकडून) श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानचे श्री. ऋषिराज कणसे, श्री. ओंकार डोंगरे, दैनिक ‘सनातन प्रभात’चे वार्ताहर श्री. राहुल कोल्हापुरे, हिंदु जनजागृती समितीचे श्री. राजेंद्र सांभारे आणि श्री. नितीन चौगुले सातारा – सध्या विविध जिहादांच्या माध्यमांतून धर्मांधांनी देशात उच्छाद मांडला आहे. देशात प्रतिदिन ४० सहस्रांहून अधिक हिंदु युवती ‘लव्ह जिहाद’ला बळी पडत आहेत. हिंदु जनजागृती समितीने ‘हलाल सर्टिफिकेशन’ विषयी चालवलेली जागृती कौतुकास्पद आहे. अन्य हिंदुत्वनिष्ठ संघटनांनीही याला पाठिंबा दर्शवून हिंदूंमध्ये जागृती केली पाहिजे, असे प्रतिपादन अकोला येथील कालीपुत्र पू. कालीचरण महाराज यांनी केले. सध्या पू. कालीचरण महाराज पश्चिम महाराष्ट्र दौर्यावर असून त्यांचा मुक्काम सातारा जिल्ह्यात होता. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे श्री. राजेंद्र सांभारे आणि दैनिक ‘सनातन प्रभात’चे वार्ताहर श्री. राहुल कोल्हापूरे यांनी त्यांची भेट घेतली तेव्हा ते बोलत होते. सनातनला सप्तर्षींचे आशीर्वाद ! – पू. कालीचरण महाराज सनातनचे धर्मजागृतीचे कार्य अत्यंत कौतुकास्पद असून सूक्ष्म-जगताचा अभ्यासही विलक्षण आहे. सनातन संस्थेला साक्षात् सप्तर्षींचे आशीर्वाद आहेत. मीही सनातनचाच आहे. जो धर्माभिमानी हिंदु आहे, तो प्रत्येक जण सनातनचाच आहे. आपल्यासमवेत साक्षात् भगवंताचे आशीर्वाद असतांना आपण कशासाठी कुणाला घाबरायचे ? Tags : Boycott Halal productsHindu Janajagruti SamitiLove Jihadहिंदूंच्या समस्याRelated Newsप्रयागराज कुंभमध्ये हिंदु जनजागृती समितीची ‘हिंदू एकता पदयात्रा’ January 23, 2025आदिशंकर अद्वैत आखाडा यांनी आयोजित केलेल्या केरळ कुंभमेळ्यात करण्यात आला हिंदु जनजागृती समितीचा सत्कार January 23, 2025महाकुंभमेळ्यात काश्मीर आणि बांगलादेशी हिंदूंवर झालेल्या अत्याचारांसंबंधी चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन January 22, 2025 Leave a Reply Cancel replyYour email address will not be published. Required fields are marked *Comment * Name * Email * Website Save my name, email, and website in this browser for the next time I comment.
आदिशंकर अद्वैत आखाडा यांनी आयोजित केलेल्या केरळ कुंभमेळ्यात करण्यात आला हिंदु जनजागृती समितीचा सत्कार January 23, 2025
महाकुंभमेळ्यात काश्मीर आणि बांगलादेशी हिंदूंवर झालेल्या अत्याचारांसंबंधी चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन January 22, 2025