Menu Close

श्रीनगर येथे आतंकवादी आक्रमणाच्या वेळी पोलिसांकडे नव्हती शस्त्रे !

  • बसही ‘बुलेट प्रूफ’ नव्हती !

  • आक्रमणात आतापर्यंत ३ पोलीस हुतात्मा !

काश्मीरमध्ये जिहादी आतंकवाद्यांचा धोका पहाता इतका हलगर्जीपणा कसा केला जातो ? याला उत्तरदायी असणार्‍यांवर कारवाई झाली पाहिजे ! – संपादक दैनिक सनातन प्रभात

श्रीनगर (जम्मू-काश्मीर) – येथील जेवन भागात १३ डिसेंबरच्या सायंकाळी पोलिसांच्य बसवर झालेल्या आतंकवादी आक्रमणात आतापर्यंत ३ पोलीस हुतात्मा झाले आहेत. या बसमध्ये एकूण १४ पोलीस, तर एक वाहनचालक होता. बसमधील पोलिसांकडे शस्त्रे नव्हती.

आतंकवाद्यांनी जवळपास ६ मिनिटे बसवर गोळीबार केल्याने यात सर्व पोलीस घायाळ झाले. यातील तिघांचा नंतर मृत्यू झाला. ही बस येथील पोलीस मुख्यालयात जात होती. ही बस ‘बुलेट प्रूफ’ नव्हती, असेही समोर आले आहे. आक्रमण करून पळून गेलेल्या आतंकवाद्यांचा पोलीस आणि सुरक्षादल शोध घेत आहेत.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *