Menu Close

आता हिंदु धर्मात परतण्याची वेळ आली आहे ! – जितेंद्र नारायण सिंह त्यागी (पूर्वीचे वसीम रिजवी)

‘हिंदु धर्मात पुनर्प्रवेश : आवश्यकता आणि उपाय !’ या विषयावर ‘ऑनलाईन’ विशेष संवाद !

पूर्वीच्या काळी मनुष्याला संपवण्यासाठी राक्षसी शक्ती कार्यरत होत्या. आता ते राक्षस कट्टरपंथीयांच्या रूपात कार्यरत असून त्यांना आपण आतंकवादी म्हणतो. सर्वांत पुरातन सनातन धर्माला संपवण्यासाठी त्यांनी कंबर कसलेली आहे; मात्र आम्ही त्यांना हिंदु धर्मात प्रवेशाचा मार्ग दाखवल्यामुळे आज अनेकजण हिंदु धर्मात प्रवेश करू इच्छित आहेत. ते मिळून मिसळून राहू इच्छितात; मात्र हिंदु धर्मात प्रवेश केल्यावर कट्टरपंथीयांपासून आपले वाईट हाल होण्याची त्यांना भीती आहे; मात्र ती भीतीही आता कमी होत आहे. पूर्वी त्यांचे तलवारीच्या बळावर बलपूर्वक धर्मांतर झाले होते; मात्र ते आता हिंदु धर्माकडे आकर्षित होत आहेत. आता हिंदु धर्मात परतण्याची वेळ आली आहे, अशी स्पष्ट भूमिका श्री. जितेंद्र नारायण सिंह त्यागी (पूर्वीचे वसीम रिजवी) यांनी मांडली. ते हिंदु जनजागृती समिती आयोजित ‘हिंदु धर्मात पुनर्प्रवेश : आवश्यकता आणि उपाय’ या ‘ऑनलाईन’ संवादात बोलत होते.

हिंदु धर्मात प्रवेश करणार्‍यांचे विशाल हृदयाने स्वागत करा ! – श्रीगुरु परमात्माजी महाराज

संपूर्ण विश्वात हिंदु धर्मासारखा श्रेष्ठ धर्म नाही, हे सत्य मौलवी, पाद्री यांनाही माहिती आहे; मात्र खोट्या गोष्टींचा आधार घेऊन ते हिंदूंचे धर्मांतर करत आहेत. जे हिंदु धर्मात प्रवेश करू इच्छित आहेत, त्यांना समाजात प्रतिष्ठा आणि मान्यता मिळण्यासाठी हिंदु समाजाने पुढे येऊन एक सुदृृढ योजना आखली पाहिजे. इंडोनेशियासारख्या देशात एकाच वेळी 50 हजार मुसलमानांनी हिंदु धर्मांत प्रवेश केल्याची हल्लीची घटना आपल्यासमोर आहे. हिंदु धर्मात प्रवेश करणार्‍यांच्या मनात अजून भीती आहे; म्हणून हिंदु समाजाने अशांना सामाजिक पाठिंबा देऊन विशाल हृदयाने त्यांचे स्वागत केले पाहिजे, असे प्रतिपादन श्रीक्षेत्र द्वारापुर, धारवाड येथील ‘श्री परमात्मा महासंस्थानम्’चे श्रीगुरु परमात्माजी महाराज यांनी केले.

‘श्रेष्ठ संघटने’चे संस्थापक अधिवक्ता सत्येंद्र वसिष्ठ म्हणाले की, मोठ्या संख्येने पीडीत लोक इस्लाम सोडायला तयार आहेत. हिंदु धर्मात पुनर्प्रवेश करणारे कट्टर मार्ग सोडून उदार विचारधारा अंगिकारत आहेत, हे लक्षात घेतले पाहिजे. अशांना हिंदु धर्मात येण्यासाठी योग्य मंच देऊन सामावून घेतले पाहिजे. जे हिंदु धर्मात पुनर्प्रवेश करत आहेत, त्यांचे योग्य पुनर्वसनही करणे आवश्यक आहे.

हिंदु जनजागृती समितीचे प्रवक्ता श्री. नरेंद्र सुर्वे म्हणाले की, कट्टरतावादामुळे युरोपमध्ये आता इस्लाम सोडण्याची एक चळवळ उभी राहिली आहे. अनेकांनी हातात फलक धरून इस्लाम सोडत असल्याचे फोटो ट्वटिरवर टाकले आहेत. वॉशिंग्टन येथील ‘प्यू रिसर्ज संस्थे’च्या सर्वेक्षणानुसार भारतातील 6 टक्के मुसलमानांना इस्लाममध्ये सांगितलेल्या गोष्टींवर विश्‍वास नाही. असे 6 टक्के लोक सनातन हिंदु धर्मात प्रवेश करू शकतात. वसिम रिजवी आणि केरळचे अली अकबर हे नव्हे, तर संपूर्ण देशात इस्लाम सोडण्याचे वातावरण निर्माण झाले आहे.

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *