|
पिसोळी (पुणे) – येथील वनविभागाच्या जागेवर असलेल्या द्वारकाधीश गोशाळेवर वनविभागाकडून १५ डिसेंबर या दिवशी कारवाई करण्यात आली. वनविभागाकडे मागील १ मासापासून गोशाळेकडून जागेविषयी प्रस्ताव देण्यात आला होता. त्या प्रस्तावात ‘अन्य भूमी वनविभागाला देऊ करून बांधलेल्या गोशाळेला वनविभागाने हटवू नये’, असा उल्लेख होता. गोशाळेमध्ये कत्तलीपासून वाचवलेल्या २०० गोवंशांचे पालन करण्यात येत होते. त्यासह गोशाळेच्या परिसरात वृषक्षारोपणही करण्यात आले होते.
वनविभागाला जागेविषयी प्रस्ताव दिलेला असतांनाही प्रस्ताव पारित करण्यापूर्वीच ही कारवाई करण्यात आली आहे. स्थानिक पोलीसही कोंढवा भागात मोठ्या प्रमाणात कत्तलीपासून वाचवलेल्या गोवंशांना या गोशाळेमध्ये देखभालीसाठी पाठवत असत. वनविभागाच्या एकूण भूमीच्या परिसरात अनेक अनधिकृत झोपडपट्ट्या असूनही गोशाळेवर हेतूपुरस्सर कारवाई करण्यात आल्याचे गोशाळेच्या पदाधिकार्यांचे म्हणणे आहे. ‘यामागे राजकीय हस्तक्षेप आहे’ असाही दाट संशय स्थानिक गोरक्षकांकडून व्यक्त केला जात आहे. (प्रतापगड, विशाळगड यांसारख्या अनेक गडकोटांवर अन्य धर्मियांकडून वर्षानुवर्षे अनधिकृत बांधकामे होत आहेत. उच्च न्यायालयानेही काही ठिकाणांचे अनधिकृत बांधकाम काढण्यात यावे, असे आदेश दिले असतांनाही त्यावर मात्र कारवाई होत नाही; परंतु हिंदूंंच्या गोशाळा, मंदिरे यांवर तडक कारवाई केली जाते. हिंदूंनो, प्रशासनाचा हा दुतोंडीपणा जाणा आणि हिंदुहितासाठी संघटित व्हा ! – संपादक दैनिक सनातन प्रभात)
वनविभागाच्या भेदभाव असलेल्या कारवाईचा निषेध ! – अंकुश पांडुरंग गोडसे, अखिल भारत कृषी गोसेवा संघ, सांगलीमूळ गायरानाकरिता राखीव असलेली भूमी वनविभागाने हस्तांतरण केली आणि या भूमीवर असलेली गोशाळा ही अवैध ठरवून ती वनविभाग अन् पोलीस प्रशासन यांनी भुईसपाट केली. ही कारवाई ही फक्त राजकीय हेतूने झालेली आहे. सरकारी कार्यालयीन वेळेनुसार सकाळी १० नंतर कारवाई अपेक्षित होती; परंतु अतिक्रमण काढणारे कर्मचारी पहाटे ६ वाजता आले. आजूबाजूला असणार्या राखीव वन क्षेत्रात काही एका समुदायाने अवैध झोपड्या, घरे बांधली आहेत. त्यावर कारवाई होत नाही. मी कारवाईच्या विरोधात नसून वनविभागाच्या या भेदभाव असणार्या कारवाईचा मी निषेध करतो. |