Menu Close

राज्य सरकारने प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेले अफझलखानाचे थडगे पहाण्यासाठी तातडीने खुले करावे ! – नितीन शिंदे, माजी आमदार

श्री शिवप्रताप भूमी मुक्ती आंदोलनाच्या वतीने परत एकदा राज्यव्यापी आंदोलन

महाबळेश्वर येथे पत्रकार परिषदेत बोलतांना श्री. नितीन शिंदे (मध्यभागी) तसेच अन्य

महाबळेश्वर (जिल्हा सातारा) – देशातील भावी पिढीला छत्रपती शिवाजी महाराज यांनी किल्ले प्रतापगडाच्या पायथ्याशी केलेल्या दैदिप्यमान पराक्रमाची साक्ष असलेले अफझलखान आणि त्याचा अंगरक्षक सय्यद बंडा यांचे थडगे सामान्यांना पहाता यावे यासाठी राज्य सरकारने तातडीने खुले करावे, या मागणीसाठी श्री शिवप्रताप भूमी मुक्ती आंदोलनाच्या वतीने आम्ही परत एकदा राज्यव्यापी आंदोलन चालू करत आहोत, अशी माहिती माजी आमदार श्री. नितीन शिंदे यांनी महाबळेश्वर येथील पत्रकार परिषदेत दिली.

या वेळी भाजप महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा तसेच सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेच्या नगरसेविका अधिवक्त्या (सौ.) स्वाती शिंदे, भाजप युवा मोर्चाचे सरचिटणीस श्री. आदित्य पटवर्धन, कामगार आघाडीचे सरचिटणीस श्री. गजानन मोरे, सर्वश्री चेतन भोसले, ओंकार पवार, आकाश काळेल उपस्थित होते.

श्री. नितीन शिंदे पुढे म्हणाले,

१. राज्यात अमरावती, मालेगाव, अकोला यांसारख्या शहरात रजा अकादमीच्या धर्मांध गुंडांकडून हिंदूंच्या घरांवर आक्रमणे, दुकानांची जाळपोळ, पोलिसांच्यावर आक्रमण करण्यात आले. हे अत्यंत धोकादायक असून अशा प्रवृत्ती पुष्कळ अगोदरपासून हिंदूंना त्रास देत आहेत. यांचे पाठीराखे कोण आहेत ते शोधण्याची वेळ आली आहे.

२. शासनाने सर्वसामान्यांना अफझलखान वधाचा परिसर खुला करावा आणि तेथे अफजलखानाच्या वधाचे शिल्प उभे करावे. त्यावर मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेत शिवप्रतापाचा इतिहास लिहावा; जेणेकरून देशभरातील शिवभक्तांना तो पहाता अन् वाचता येईल. त्यासाठी परत एकदा आंदोलनाची हाक देण्यात आली असून या आंदोलनात महाराष्ट्रातील हिंदुत्वनिष्ठ संघटना यांना समवेत घेऊन आंदोलन उभे करण्यात येणार आहे.

३. राज्यात भाजप-शिवसेना युतीचे सरकार असतांना मी विधानपरिषदेत किल्ले प्रतापगडावर अफजलखानाच्या अनुयायांकडून अफझलखानाच्या थडग्याचे उदात्तीकरण करण्यात येत आहे, याविषयी प्रश्न उपस्थित करून शासनाचे लक्ष वेधले होते. नंतर थडग्याचे रूपांतर दर्ग्यात आणि दर्ग्याचे रूपांतर मशिदीत होण्याचा धोका याविषयी राज्य सरकारला अवगत केले होते; परंतु सरकारने याकडे दुर्लक्ष केल्याने मी शिवप्रताप भूमी मुक्ती आंदोलन चालू केले.

४. याची नोंद घेऊन तत्कालीन शासनाने किल्ले प्रतापगडावर चालू असलेले अफझलखानाचे उदात्तीकरण बंद पाडले आणि कबर परिसराचे थडग्याभोवती केलेले सुशोभीकरण हटवले. त्यानंतर प्रतापगडावर सातारा जिल्हा प्रशासनाच्या वतीने शिवप्रतापदिन साजरा केला जाऊ लागला.

५. त्या वेळी शिवप्रतापदिनाच्या कार्यक्रमाला शिवभक्तांना मनाई करण्यात आली; म्हणून मी सहस्रो शिवप्रेमींच्या उपस्थितीत प्रतापगड येथे शिवप्रतापदिन साजरा केला होता. त्या वेळी शासनाचा बंदी आदेश डावलून उत्सव साजरा केला; म्हणून प्रशासनाने माझ्यावर खटला नोंद केला होता. या खटल्यातून माझी नुकतीच निर्दाेष मुक्तता करण्यात आली आहे.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *