Menu Close

… तर संपूर्ण भारतात पडसाद उमटतील ! – श्यामसिंह ठाकूर, प्रदेशाध्यक्ष, महाराष्ट्र करणी सेना

चित्रपटाचे ‘पृथ्वीराज’ असे नामकरण करून सम्राट पृथ्वीराज चौहान यांचा अवमान केल्याचे प्रकरण 

इतिहासावर आधारित चित्रपटांविषयी सातत्याने निर्माण होणार्‍या वादाच्या पार्श्वभूमीवर अशा चित्रपटांची सत्यता पडताळण्यासाठी केंद्रशासनाने धोरण निश्चित करावे !- संपादक 

मुंबई – सम्राट पृथ्वीराज चौहान हे हिंदूंचे शेवटचे सम्राट होते. त्यांच्याविषयी सर्व भारतीय आणि हिंदु समाज यांच्या मनात आदर आहे. त्यांच्या नावाचा एकेरी उल्लेख आम्ही कदापि सहन करणार नाही. यामुळे सर्व हिंदूंच्या भावना दुखावल्या आहेत. ‘पृथ्वीराज’ या चित्रपटामध्ये सम्राट पृथ्वीराज चौहान यांचा एकेरी उल्लेख झाल्यास त्याचे परिणाम संपूर्ण भारतात उमटतील, अशी चेतावणी महाराष्ट्र करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष श्री. श्यामसिंह ठाकूर यांनी दिली. महाराष्ट्र करणी सेनेच्या वतीने १५ डिसेंबर या दिवशी मुंबई मराठी पत्रकार संघात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ‘यशराज फिल्म्स’चा ‘पृथ्वीराज’ हा चित्रपट

२१ जानेवारी २०२२ या दिवशी प्रदर्शित होणार आहे.

या वेळी श्री. श्यामसिंह ठाकूर म्हणाले, ‘‘सम्राट पृथ्वीराज चौहान यांच्या एकेरी नावाला आमचा आक्षेप आहे. चित्रपटाला विरोध करण्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरून वैध मार्गाने आंदोलन करू. याविषयी आम्ही राज्यपालांची भेट घेऊ. इतिहासाची छेडछाड होत असतांना केंद्र आणि राज्य सरकार यांनी याकडे दुर्लक्ष करणे चुकीचे आहे. या प्रकरणी केंद्र आणि राज्य शासन यांनी कारवाई करावी.’’

… तर महाराष्ट्रात चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही ! – अजय सिंह सेंगर, प्रमुख, महाराष्ट्र करणी सेना

‘पृथ्वीराज चौहान’ असा चित्रपटाचा उल्लेख एकेरी आहे. या चित्रपटात राणी संयोगिता यांना नृत्य करतांना दाखवण्यात आले आहे. या चित्रपटात महंमद घोरी याचे उदात्तीकरण करण्यात आले आहे. यापूर्वी मुसलमान इतिहासकारांनी केलेल्या लिखाणावर ‘पद्मावती’ हा चित्रपट काढण्यात आला होता. ‘पृथ्वीराज चौहान’ हा चित्रपटही मुसलमान इतिहासकाराच्या लिखाणातूनच सिद्ध करण्यात आला आहे. या चित्रपटात हिंदु धर्माला न्यून लेखण्यात आले आहे. हिंदु सम्राट असलेल्या राज्यावर चित्रपट काढण्यासाठी हिंदु इतिहासकार मिळत नाहीत का ?

न्यायालयात जाऊन चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी आणू ! – अधिवक्ता राघवेंद्र मल्होत्रा

‘पृथ्वीराज चौहान’ या चित्रपटाचा ‘ट्रेलर’ (चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी त्याच्या प्रचारार्थ करण्यात आलेले विज्ञापन) आम्ही पाहिला आहे. याविषयी निर्मात्यांना आम्ही १ डिसेंबर या दिवशी कायदेशीर नोटीस पाठवली आहे. यावर उत्तरासाठी आम्ही ७ दिवसांची मुदत दिली होती; मात्र त्यावर उत्तर आलेले नाही. त्यामुळे आता न्यायालयात जाऊन आम्ही चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी आणू. चित्रपटाला ‘सम्राट पृथ्वीराज चौहान’ किंवा सन्माननीय असे काहीसे नाव द्यावे. ‘ट्रेलर’मध्ये महाराणी संयोगिता यांच्या शरिराचा भाग उघडा दाखवण्यात आला आहे. ‘चित्रपटाला देण्यात आलेला हा ‘ग्लॅमर’चा तडाखा थांबवण्यात यावा. तशीच त्यात दाखवण्यात आलेली माहिती योग्य आहे का ? याविषयी इतिसकारांकडून पडताळणी करण्यात यावी. त्यानंतरच चित्रपट प्रदर्शित करण्यात यावा’, अशी आमची मागणी आहे.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *