Menu Close

वर्ष १९७१ च्या युद्धात पाक सैन्याने मंदिर पाडून २५० हून अधिक हिंदूंची केली होती हत्या !

भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते ढाका येथील प्राचीन मंदिराच्या जीर्णोद्धारानंतर लोकार्पण !

  • भारताच्या सैन्याने कधी मशीद किंवा चर्च पाडल्याची एकतरी घटना आहे का ?
  • पाक सैन्याच्या या हिंदुद्वेषी कृत्याविषयी भारतातील एकही पुरो(अधो)गामी आणि निधर्मीवादी कधी बोलत नाहीत, हे लक्षात घ्या !
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी १७ डिसेंबरला बांगलादेश येथील जीर्णोद्धार केलेल्या रमना काली बारी मंदिराचे लोकार्पण केले

ढाका (बांगलादेश) – भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी त्यांच्या ३ दिवसीय बांगलादेश दौर्‍याच्या वेळी १७ डिसेंबरला येथील जीर्णोद्धार केलेल्या रमना काली बारी मंदिराचे लोकार्पण केले. वर्ष १९७१ च्या युद्धामध्ये पाकच्या सैन्याने हे मंदिर पाडले होते.

त्यानंतर काही वर्षांनी हे मंदिर पुन्हा बांधण्यात आले होते. पाक सैन्याने त्या वेळी येथे २५० हून अधिक हिंदूंना ठार केले होते.

 

यांत पुरुष, महिला आणि लहान मुले होती. पाकिस्तानी सैन्याने जेव्हा मंदिरावर आक्रमण केले, तेव्हा मंदिराचे पुजारी श्रीमठ स्वामी परमानंद गिरि यांनी देवीची मूर्ती हातात धरली होती.

 

पाक सैन्याने त्यांनाही ठार केले होते. हे मंदिर ६०० वर्षे प्राचीन असल्याचे सांगण्यात येते.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *