Menu Close

‘इस्लामपूर’चे नामकरण ‘ईश्वरपूर’ करावे या मागणीसाठी शिवसेनेचे पालिकेसमोर जोरदार शक्तीप्रदर्शन !

‘इस्लामपूर’चे नामकरण ‘ईश्वरपूर’ करावे या मागणीसाठीएकत्र केलेल्या स्वाक्षर्‍या पालिकेला सुपूर्द करण्यासाठी घेऊन जातांना जिल्हाप्रमुख आनंदराव पवार आणि शिवसैनिक

ईश्वरपूर – ‘इस्लामपूर’चे नामकरण ‘ईश्वरपूर’ करावे या मागणीसाठी शिवसेनेने आंदोलन चालू केले आहे. या आंदोलनाच्या निमित्ताने स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली होती. या एकत्र केलेल्या स्वाक्षर्‍या घेऊन शिवसेनेचे जिल्हाप्रमुख श्री. आनंदराव पवार यांनी शिवसैनिकांसहपालिकेवर जोरदार शक्तीप्रदर्शन करत धडक मारली. या वेळी शिवसैनिकांनी भगवे फेटे घातले होते आणि हातात भगवे ध्वज होते. एकत्र केलेल्या या स्वाक्षर्‍या भगव्या वस्त्रात गुंडाळून पालिका प्रशासनाकडे सोपवण्यात आल्या. (अशी मागणी का करावी लागते ?प्रशासनाला लक्षात का येत नाही ? – संपादक दैनिक सनातन प्रभात)

नामांतरासाठी बोलावण्यात आलेली विशेष सभा ‘कोरम’ अभावी स्थगित !

‘इस्लामपूर’चे नामकरण ‘ईश्वरपूर’ करावे याच सूत्रासाठी १७ डिसेंबर या दिवशी पालिकेची विशेष सभा बोलावण्यात आली होती. या सभेसाठी एकूण ३२ पैकी ९ सदस्य उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व आणि सत्ताधारी विकास आघाडीचे ४ सदस्य अनुपस्थित होते. त्यामुळे ‘कोरम’ (सभा घेण्यासाठी आवश्यक असलेली सदस्य संख्या) अभावी ही सभा स्थगित करण्यात आली.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *