Menu Close

भारतामध्ये समांतर अर्थव्यवस्था निर्माण करणारे ‘हलाल प्रमाणपत्र’ रहित करण्यात यावे !

निवेदन देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपस्थित धर्मप्रेमी

सोलापूर – भारतामध्ये समांतर अर्थव्यवस्था निर्माण करणारे हलाल प्रमाणपत्र रहित करण्यात यावे, या मागणीचे निवेदन येथील हिंदुराष्ट्र प्रतिष्ठान आणि हिंदू एकता प्रतिष्ठान या संघटनांच्या वतीने प्रशासनाला देण्यात आले. हे निवेदन जिल्हाधिकार्‍यांच्या वतीने महसूल उपजिल्हाधिकारी विठ्ठल उदमले यांनी स्वीकारले. या हिंदुत्वनिष्ठ संघटनांना ‘हलाल प्रमाणपत्रा’चे संकट समजल्यानंतर त्यांनी ‘हलालचे चिन्ह असलेल्या वस्तू खरेदी करणार नाही’, असा निर्धार केला आणि उत्स्फूर्तपणे एकत्र येऊन प्रशासनाला निवेदन दिले. (धर्मावरील आघात रोखण्यासाठी त्वरित कृती करणार्‍या हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे अभिनंदन ! सोलापूर येथील हिंदुराष्ट्र प्रतिष्ठान आणि हिंदू एकता प्रतिष्ठान या संघटनांचा सर्वत्रच्या हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी आदर्श घ्यावा. – संपादक दैनिक सनातन प्रभात)

या वेळी दोन्ही संघटनांचे सर्वश्री अविनाश मदनावाले, साहिल गायकवाड, प्रताप मनसावाले, प्रीतम जाधव, देविदास सत्तारवाले, मनोज शिवसिंगवाले, ओम जगताप, अमेय साखरे, युवराज चौधरी, अभिषेक नागराळे आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *