पंजाब : येशू ख्रिस्ताच्या नावाने शिक्षण केंद्र स्थापन करून तेथे ख्रिस्ती धर्म आणि बायबल यांचे शिक्षण देणार ! December 20, 2021 Share On : पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीतसिंह चन्नी (मध्यभागी) चंडीगड – पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीतसिंह चन्नी यांनी राज्यात येशू ख्रिस्ताच्या नावाने शिक्षण केंद्र स्थापन करण्याची घोषणा केली आहे. येथे बायबल आणि ख्रिस्ती धर्म यांचे शिक्षण देण्यात येणार आहे. तसेच राज्यातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये सामाजिक सभागृह बनवण्याचीही घोषणा मुख्यमंत्री चन्नी यांनी केली. ज्या जिल्ह्यांमध्ये ख्रिस्त्यांना कब्रस्तानासाठी भूमी उपलब्ध नाही, तेथे त्यांना ती उपलब्ध करून देण्यात येईल. ‘ख्रिस्ती वेलफेयर बोर्डा’साठी १ कोटी रुपये देण्यात येणार, तसेच ख्रिस्त्यांना वीज दरामध्ये सवलत देण्यात येणार आहे. हे सर्व निर्णय मुख्यमंत्री चन्नी यांनी राज्याच्या अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष प्रा. इमॅन्युएल नाहर यांच्याशी झालेल्या बैठकीमध्ये घेतले. Punjab will set up university chair to study Bible https://t.co/SgGcl0EhAG — TOIChandigarh (@TOIChandigarh) December 17, 2021 ख्रिस्त्यांच्या मागण्या मान्य करणारे चन्नी हे पंजाबचे पहिले मुख्यमंत्री ! – अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष प्रा. इमॅन्युएल नाहर मुख्यमंत्री चन्नी यांनी केलेल्या वरील सर्व घोषणांविषयी इमॅन्युअल नाहर म्हणाले की, स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच पंजाबच्या एखाद्या मुख्यमंत्र्याने ख्रिस्त्यांसाठी अशी पावले उचलली आहेत. येशू ख्रिस्ताच्या नावाने शिक्षण केंद्र असण्याविषयी आमची जुनी मागणी होती. ती मान्य करण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांनी आमच्या सर्व समस्यांचे समाधान केले आहे. Tags : Featured Newsअल्पसंख्यांकांचे लांगूलचालनख्रिस्तीराष्ट्रीयRelated Newsबांगलादेशी हिंदूंवरील अत्याचार पाहून जागा होत नाही, तो हिंदु नव्हे – नवनीत राणा, माजी खासदार December 20, 2024काशीगाव (मीरा-भाईंदर) येथील हजरत गौर शाह बाबाचा अनधिकृत दर्गा आणि मशीद यांवर कारवाई करा – अधिवक्ता खुश खंडेलवाल, हिंदु टास्क फोर्स December 16, 2024देशात १० मशिदींच्या ठिकाणी मंदिरे असल्याचे खटले न्यायालयात प्रलंबित ! December 14, 2024 Leave a Reply Cancel replyYour email address will not be published. Required fields are marked *Comment * Name * Email * Website Save my name, email, and website in this browser for the next time I comment.
बांगलादेशी हिंदूंवरील अत्याचार पाहून जागा होत नाही, तो हिंदु नव्हे – नवनीत राणा, माजी खासदार December 20, 2024
काशीगाव (मीरा-भाईंदर) येथील हजरत गौर शाह बाबाचा अनधिकृत दर्गा आणि मशीद यांवर कारवाई करा – अधिवक्ता खुश खंडेलवाल, हिंदु टास्क फोर्स December 16, 2024