Menu Close

‘लव्ह जिहाद’ आणि धर्मांधांनी हिंदु महिलांवर केलेले अत्याचार या घटनांच्या बातम्या

धर्मांधाने ‘मनिष’ बनून हिंदु विद्यार्थिनीला फसवले आणि बलपूर्वक धर्मांतर करून लग्न केल्यावर सोडले !

  • अमरोहा (उत्तरप्रदेश) मध्ये लव्ह जिहादची घटना !

  • धर्मांधाने सामाजिक माध्यमांवर पीडितेच्या अश्लील चित्रफीती प्रसारित केल्या !

केंद्र सरकारने राष्ट्रीय स्तरावर ‘लव्ह जिहाद’विरोधी कायदा करून हिंदु युवतींचे आयुष्य वाचवण्यासाठी प्रयत्न करायला हवेत, अशी हिंदूंची अपेक्षा आहे ! – संपादक दैनिक सनातन प्रभात

अमरोहा (उत्तरप्रदेश) – जिल्ह्यामध्ये ‘लव्ह जिहाद’चे एक खळबळजनक प्रकरण उघड झाले आहे. येथील मोनिश कुरेशी याने ‘मनिष’ नावाने कला शाखेतील पदव्युत्तर शिक्षण घेणार्‍या एका विद्यार्थिनीला प्रेमाच्या जाळ्यात फसवले. त्यानंतर त्याने विद्यार्थिनीचे बलपूर्वक धर्मांतर करून तिच्याशी लग्न केले आणि सातत्याने बलात्कार केला. त्याच वेळी आरोपीने तिच्या अनेक अश्लील चित्रफितही बनवल्या. पीडितेला धर्मांधाचा असह्य त्रास झाल्याने तिने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ‘या संदर्भात पोलिसांकडे तक्रार करायची नाही’, या अटीवर त्याने पीडितेला सोडले; परंतु परत आरोपी तिला दूरभाष करून त्याच्याकडे येण्यासाठी त्रास देऊ लागला. तसेच धर्मांधाने सामाजिक माध्यमांवर पीडितेच्या नावाने खोटे खाते बनवून तिच्या अश्लील चित्रफीती प्रसारित केल्या. त्यामुळे पीडितेने या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी आरोपीला अटक केली; पण ७ दिवसांनी त्याची सुटका झाली आहे.

१. मिळालेल्या माहितीप्रमाणे पीडिता अमरोहा येथील एका भागात रहाते. तिने सांगितले की, ती उझारी येथे कला शाखेच्या पदवीचे शिक्षण घेत असतांना तेथे रहात असलेला आरोपी तिचा पाठलाग करायचा. एक दिवस त्याने विद्यार्थिनीला थांबवून त्याचे नाव ‘मनिष’ असल्याचे सांगितले आणि तिच्यासमोर प्रेमाचा प्रस्ताव ठेवला.

२. विद्यार्थिनीला प्रेमाच्या जाळ्यात फसवल्यानंतर ऑक्टोबर २०२० मध्ये आरोपीने तिला पळवून नेले आणि औरियाच्या दलेलनगर गावातील नातेवाईक ग्रामप्रधान नुरी खान यांच्याकडे नेले. त्या वेळी पीडितेला आरोपी हा ‘मोनिश कुरेशी’ असल्याचे समजले.

३. तेथे नुरीचा पती इक्बाल खान, मोनिशच्या तीन बहिणी आणि जावई यांनी पीडितेवर धर्मांतर करण्यासाठी दबाव टाकला. त्यांनी पीडितेने धर्मांतर करून निकाह (लग्न) न केल्यास तिची हत्या करण्याची धमकी दिली. त्यानंतर गावातीलच मौलवीला बोलावून विद्यार्थिनीचे धर्मांतर करण्यात आले आणि नंतर निकाह करण्यात आला.

४. पीडितेने सांगितले की, आरोपी तिला खोलीत बंद करून ठेवू लागला. एक मासानंतर आरोपीने पीडितेला औरिया आणि नंतर तो गजरौलामध्ये त्याची बहीण तराना येथे घेऊन गेला. तेथे बहिणीचा नवरा आणि बहिणीचा मुलगा यांनी तिच्याशी छेड काढण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे तिने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

५. त्यानंतर आरोपीने पीडितेकडून एका ‘स्टॅम्प पेपर’वर बलपूर्वक स्वाक्षरी घेऊन फेब्रुवारी २०२१ मध्ये तिला घरच्यांकडे सोपवले. तेव्हा त्याने ‘पोलीस तक्रार केल्यास पीडितेच्या अश्लील चित्रफीत प्रसारित करीन’, अशी धमकी दिली.


लक्ष्मणपुरी (लखनौ) मध्ये धर्मांधाने ‘विशाल’ नावाने हिंदु युवतीचे शारीरिक शोषण करून अडीच लाख रुपये हडपले !

उत्तरप्रदेशमध्ये ‘लव्ह जिहाद’विरोधी कायदा केल्यानंतरही जर धर्मांध हिंदु युवतींची फसवणूक करत असतील, तर कायद्याची किती प्रभावीपणे कार्यवाही होणे आवश्यक आहे, हेच यातून लक्षात येते ! – संपादक दैनिक सनातन प्रभात

लक्ष्मणपुरी (लखनौ) – जिल्ह्यामध्ये लव्ह जिहादच्या एका प्रकरणामध्ये नवाजिश नावाच्या धर्मांधाने ‘विशाल ठाकूर’ या नावाने एका हिंदु युवतीशी मैत्री केली. त्यानंतर त्याने पीडितेला लग्नाचे आमीष दाखवून तिचे शारीरिक शोषण केले आणि तिच्याकडून अडीच लाख रुपये हडपले. या प्रकरणी पीडितेने अलीगंज पोलीस ठाण्यात तक्रार नाेंदवल्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. पोलिसांनी आरोपीचे लॅपटॉप आणि भ्रमणभाष यांच्यामधून अनेक मुलींचे छायाचित्रे अन् भ्रमणभाष क्रमांक कह्यात घेतले आहेत. आरोपी या मुलींनाही लग्नाचे आमीष देऊन त्यांचे शारीरिक शोषण करत असेल आणि त्यांच्याकडून पैसे हडप करत असेल, असा पोलिसांना संशय आहे.

१. अलीगंज येथे नवाजिश बँकेची कागदपत्रे पडताळणी करत असतांना त्याला एका युवतीचा भ्रमणभाष क्रमांक मिळाला.

२. नवाजिश स्वत:ला हिंदु असल्याचे दाखवण्यासाठी हाताला लाल धागा बांधत होता, तसेच हिंदु पद्धतीप्रमाणे वागण्याचे ढोंग करत होता. त्यामुळे पीडितेला नवाजिशवर संशय आला नाही. जेव्हा पीडितेला वास्तव समजले, तेव्हा तिने नवाजिशच्या विरोधात पोलीस तक्रार प्रविष्ट केली.

३. गाझीपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल कुमार यांनी सांगितले की, आरोपी आंबेडकरनगरमधील बसखारी येथील रहिवासी आहे आणि एका खासगी विद्यालयात शिक्षण घेत आहे.


रायपूरमध्ये (छत्तीसगड) धर्मांधांकडून अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार

अल्पसंख्यांक गुन्हेगारीमध्ये बहुसंख्य ! – संपादक दैनिक सनातन प्रभात

रायपूर (छत्तीसगड) – येथील कमल विहार भागामध्ये जावेद आणि रहमान यांनी एका १६ वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार केला. त्यानंतर आरोपींनी मुलीला पचपेडी नाक्याजवळ सोडून पळ काढला. पीडितेच्या नातेवाईकांनी पोलीस तक्रार केल्यानंतर पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली.

१. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दोन्ही आरोपी रिक्शा चालवण्याचे काम करतात आणि ते दोघे पीडितेचे मित्र आहेत.

२. घटनेच्या दिवशी ते रिक्शा घेऊन मुलीच्या भागात गेले. त्यानंतर पीडिता त्यांच्या समवेत घरी काहीतरी निमित्त सांगून रिक्शातून बाहेर फिरायला गेली. त्या वेळी आरोपींनी पीडितेवर सामूहिक बलात्कार आणि पीडितेला ठार मारण्याची धमकी दिली.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *