Menu Close

ईश्वरी अधिष्ठान ठेवून, तसेच आपल्यातील शौर्य जागृत करून हिंदु राष्ट्र स्थापन करायचे आहे ! – सौ. धनश्री केळशीकर, हिंदु जनजागृती समिती

हिंदु जनजागृती समितीच्या सौ. धनश्री केळशीकर (मध्यभागी) आणि समवेत रणरागिणी मंडळाच्या सर्व सदस्या

कामोठे (जिल्हा रायगड) – विजयादशमी, नरकचतुर्दशी आदी हिंदूंचे सण हे शौर्यजागृती करणारे आहेत. शौर्याहून सर्वश्रेष्ठ काहीच नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी ईश्वरी अधिष्ठान ठेवून पाच पातशाह्या उद्ध्वस्त करून शौर्य गाजवले. आपल्यालाही ईश्वरी अधिष्ठान ठेवून शौर्य जागृत करून हिंदु राष्ट्र स्थापन करायचे आहे, असे मार्गदर्शन हिंदु जनजागृती समितीच्या सौ. धनश्री केळशीकर यांनी केले. येथील एकता रणरागिणी मंडळात दत्तजयंतीनिमित्त शौर्यजागृती उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी त्या बोलत होत्या. या वेळी दैनंदिन जीवनात आपल्यावर ओढवणार्‍या प्रसंगात कसा प्रतिकार करावा, तसेच छोट्या छोट्या प्रसंगांत आपण स्वरक्षण कसे करू शकतो, याविषयीची प्रात्यक्षिके दाखवण्यात आली. तसेच उपस्थित महिला युवतींकडून ती करवूनही घेण्यात आली.

या उपक्रमासाठी हिंदु स्वागत यात्रेचे अध्यक्ष श्री. प्रकाशजी शिंदे, श्री. नीलकंठ यांनी मोलाचे सहकार्य आणि मार्गदर्शन केले. सर्वश्री मंगेश आढाव, डॉ. गराळे, राहुल बुधे, काकासाहेब पवार, दशरथ पाटील, सौ. जयश्री देसाई, सौ. संगीता पवार, सौ. वैशाली जगदाळे, सौ. मनीषा नीलकंठ, सौ. नीलम आंधळे, सौ. वर्षा पाटील, सौ. स्वप्नाली दोषी, सौ. दीपा खरात, सौ. उषा डुकरे आदी एकता रणरागिणी महिला मंडळाचे सदस्य उपस्थित होते.

अभिप्राय :

हिंदु जनजागृती समितीचे आणि त्यांच्या सहकार्‍यांचे पुष्कळ धन्यवाद ! त्यांनी कामोठेकरांसाठी हा उपक्रम विनामूल्य चालू केला आहे.

– सौ. जयश्री झा, एकता रणरागिणी

क्षणचित्रे

१. स्वरक्षण प्रशिक्षणाची प्रात्यक्षिके सर्व महिलांनी उत्साहाने शिकून घेतली.

२. प्रात्यक्षिके पाहून ‘आम्हीही असा प्रतिकार करू शकतो’, असा उत्साह सर्वच युवतींकडून व्यक्त करण्यास आला.

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *