अध्यात्म, संस्कृती यांचा विचार घेत भारताने विश्वगुरूच्या भूमिकेतून जगाचे नेतृत्व करावे ! – पद्मविभूषण डॉ. विजय भटकर, ज्येष्ठ संगणकतज्ञ December 21, 2021 Share On : डॉ. विजय भटकर पुणे – वैदिक काळापासून भारताने प्रगतीचे अतीउच्च शिखर गाठल्याचे दाखले आपल्याला दिसून येतात. आपली समृद्ध परंपरा, अध्यात्म, संस्कृती यांचा विचार घेत भारताने विश्वगुरूच्या भूमिकेतून जगाचे नेतृत्व करावे. अध्यात्म आणि विज्ञान हे एकत्र आले पाहिजे, ही वैदिक काळापासूनची धारणा वास्तवात आल्यास भारताचे नेतृत्व जगाला मान्य करावेच लागेल, असे मत ज्येष्ठ संगणकतज्ञ पद्मविभूषण डॉ. विजय भटकर यांनी व्यक्त केले. ‘नॉन रेसिडेंट इंडियन पॅरेंट्स ऑर्गनायझेशन’ अर्थात् ‘नृपो’ संस्थेच्या वतीने डॉ. भटकर यांना ‘नृपो’ संस्थेचे सन्माननीय सदस्यत्व प्रदान करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते.या वेळी डॉ. भटकर पुढे म्हणाले की, एक काळ होता जेव्हा भारतीय शिक्षण व्यवस्थेतून निर्माण होणारी बौद्धिक पिढी ‘ब्रेन ड्रेन’च्या (बौद्धिक गळती) माध्यमातून पाश्चात्त्यांच्या प्रगतीत गुंतली होती; परंतु आता माहिती तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे ‘ब्रेन गेन’पर्यंत (बौद्धिक क्षमता राखणे) आपला प्रवास झाला आहे. देशात झालेल्या ‘डिजिटल’ क्रांतीमुळे शाळेपर्यंत विद्यार्थी पोचू शकत नसले, तरी विद्यार्थ्यांपर्यंत शाळा पोचत आहे. त्यामुळे अतिशय गतीने परिवर्तन आणि स्थित्यंतर घडून येत आहे. Tags : Trending Topicsअखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनअध्यात्मRelated Newsबांगलादेशात १ लाखाहून अधिक हिंदूंनी रस्त्यावर उतरून केले आंदोलन ! November 28, 2024हिंदु जनजागृती समितीच्या लढ्याला यश : नवी मुंबई येथील विमानतळाजवळील बेकायदेशीर दर्गा जमीनदोस्त! November 24, 2024‘हलाल मुक्त दिवाळी अभियाना’ला लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद October 30, 2024 Leave a Reply Cancel replyYour email address will not be published. Required fields are marked *Comment * Name * Email * Website Save my name, email, and website in this browser for the next time I comment.
हिंदु जनजागृती समितीच्या लढ्याला यश : नवी मुंबई येथील विमानतळाजवळील बेकायदेशीर दर्गा जमीनदोस्त! November 24, 2024