Menu Close

केरळमध्ये धर्मांध सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाच्या पदाधिकार्‍याच्या हत्येच्या प्रकरणी रा.स्व. संघाच्या दोघांना अटक !

भाजपच्या पदाधिकार्‍याच्या हत्येच्या प्रकरणी अद्याप कुणालाही अटक नाही !

  • केरळमध्ये माकपचे सरकार असल्याने हिंदु संघटनेच्या नेत्याची धर्मांधांनी हत्या केली असल्याने त्याचा शोध लावण्यात जाणीवपूर्वक हलगर्जीपणा केला जात आहे’, असे कुणी म्हटल्यास आश्‍चर्य ते काय ?
  • ‘धर्मांध राजकीय पक्षाच्या नेत्याच्या प्रकरणी हिंदु संघटनेच्या कार्यकर्त्यांना जाणीवपूर्वक गोवले जात आहे’, असेच हिंदूंना वाटत आहे !
एसडीपीआय चे राज्य सचिव के.एस्. शान

अलाप्पुझा (केरळ) – येथे १८ डिसेंबरच्या रात्री सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाचे (एस्.डी.पी.आय.चे) राज्य सचिव के.एस्. शान यांच्या हत्येच्या प्रकरणी केरळ पोलिसांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रसाद आणि रथीश या २ स्वयंसेवकांना अटक केली. ‘ते मन्ननचेरी गावातील रहिवासी असून हत्येमागील कटात त्यांची भूमिका होती आणि त्यांनी हत्येसाठी गाडीची व्यवस्था केली होती’, असा पोलिसांचा दावा आहे.

या प्रकरणी अन्य ८ जणांचा पोलीस शोध घेत आहेत.

शान यांच्या हत्येचा सूड म्हणून १९ डिसेंबरला भाजपचे ओबीसी मोर्चाचे राज्य सचिव रंजित श्रीनिवास यांच्या करण्यात आलेल्या हत्येच्या प्रकरणी पोलिसांनी अद्याप आरोपींना अटक केलेली नाही. (माकपच्या राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजले असल्याने अशा हत्या घडत आहेत. हे पहाता हे सरकार विसर्जित करून तेथे राष्ट्रपती राजवट लागू केली पाहिजे ! – संपादक दैनिक सनातन प्रभात)

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *