Menu Close

प्रार्थनेच्या नावाखाली शक्तीप्रदर्शन करून अन्य धर्मियांच्या भावना भडकावू नयेत ! – हरियाणाचे भाजपचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर

हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर

गुरुग्राम (हरियाणा) – सर्व धर्मांचे लोक त्यांच्या धार्मिक स्थळांमध्ये म्हणजे मंदिर, गुरुद्वारा, मशीद, चर्च आदींमध्ये प्रार्थना करतात. सणांच्या वेळी सार्वजनिक ठिकाणी प्रार्थना करण्यासाठी अनुमती दिली जाते; मात्र प्रार्थनेच्या नावाखाली शक्तीप्रदर्शन करून दुसर्‍या धर्मांतील लोकांना भडकावणे योग्य नाही, असे विधान हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी राज्याच्या विधानसभेत केले. राज्यातील गुरुग्राम येथे काही मासांपासून सार्वजनिक ठिकाणी नमाजपठणाला हिंदूंकडून होत असलेल्या विरोधाविषयी नूंह येथील काँग्रेसचे आमदार आफताब अहमद यांनी प्रश्‍न उपस्थित केला होता. त्यावर उत्तर देतांना ते बोलत होते. यापूर्वी मुख्यमंत्री खट्टर यांनी ‘उघड्यावर नमाजपठण करणे सहन करणार नाही’, असे म्हटले होते.

मुख्यमंत्री खट्टर पुढे म्हणाले की, मला याचा आनंद आहे, ‘शुक्रवारच्या नमाजासाठी एका निश्‍चित ठिकाणी नमाजपठण करण्यासाठी लोकांनी संमती दिली आहे.  सार्वजनिक ठिकाणी होणार्‍या नमाजपठणाला धार्मिक रंग देऊन सौहार्द बिघडवू नये.’

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *