Menu Close

राष्ट्रीय स्तरावर खेळणार्‍या तरुणीची हिंदुत्वनिष्ठांकडून ‘लव्ह जिहाद’च्या जाळ्यातून सुटका !

हिंदु जनजागृती समितीपुरस्कृत ‘लव्ह जिहाद’ ग्रंथ वाचून तरुणीचे मतपरिवर्तन

  • हिंदु स्त्रिया आणि तरुणी यांनी ‘लव्ह जिहाद’ला बळी पडू नये, म्हणून आधीच त्यांना हिंदु जनजागृती समितीपुरस्कृत ‘लव्ह जिहाद’ हा ग्रंथ वाचायला द्या ! – संपादक दैनिक सनातन प्रभात
  • ‘लव्ह जिहाद’ या हिंदूंच्या मुळावर उठलेल्या षड्यंत्राशी दोन हात करण्यासाठी हिंदूंना धर्मशिक्षण देण्यासमवेतच राष्ट्रव्यापी ‘लव्ह जिहाद विरोधी कायदा’ होणे आवश्यक आहे. यासाठी सर्वत्रच्या हिंदूंनी वैध मार्गाने आवाज उठवायला हवा ! – संपादक दैनिक सनातन प्रभात
हिंदु जनजागृती समितीपुरस्कृत ‘लव्ह जिहाद’ ग्रंथ

ठाणे – ठाणे जिल्ह्यात रहाणार्‍या राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू असलेल्या एका तरुणीची हिंदुत्वनिष्ठांनी ‘लव्ह जिहाद’मधून सुटका केली आहे. ‘हिंदु जनजागृती समिती’पुरस्कृत ‘लव्ह जिहाद’ नावाच्या ग्रंथामध्ये लव्ह जिहादपासून सुटका होण्यासाठी उल्लेखित कृती आणि विविध उपाय केल्यानंतर पीडित तरुणीचे मतपरिवर्तन झाले’, असे त्या तरुणीची सुटका करण्यासाठी गेलेल्या हिंदुत्वनिष्ठांनी सांगितले.

१. ठाणे जिल्ह्यातील तरुणी पुणे जिल्ह्यात रहाणार्‍या धर्मांधाच्या प्रलोभनांकडे आकर्षित होऊन ‘लव्ह जिहाद’ला बळी पडली होती. याविषयी येथील हिंदुत्वनिष्ठांना ११ डिसेंबर या दिवशी ही माहिती समजली. त्यांनी तिच्या कुटुंबियांना संपर्क केला असता तरुणी काही दिवसांपूर्वी पुणे येथे रहाणार्‍या धर्मांधासमवेत तिची महत्त्वाची कागदपत्रे, तसेच दाखले घेऊन निघून गेल्याचे समजले. तरुणीच्या आईने सांगितले, ‘‘मुलगी घरातून निघून जात असतांना धर्मांधाने २ साड्या देऊन आमच्या ‘निकाह’ला तुम्ही या’, असे सांगितले आहे.’’

२. या सर्व प्रसंगातून तरुणीची सुटका होण्यासाठी हिंदुत्वनिष्ठांनी तरुणीच्या आईच्या माध्यमातून तिला संपर्क केला. वडिलांची प्रकृती बिघडली असल्याने तिला बोलावून घेतले. तरुणी त्या धर्मांध मुलासमवेत आली. आईने वडिलांना रक्ताच्या उलट्या होत असल्याने रुग्णालयात भरती केल्याचे तरुणीला सांगितले. या वेळी धर्मांध त्याच्या साथीदारांसह तरुणीच्या घराकडे पाळत ठेवून होता. त्यानंतर हिंदुत्वनिष्ठांनी तरुणीला रुग्णालयात नेत असल्याचे सांगून सुरक्षित ठिकाणी नेले.

३. तेथे हिंदु जनजागृती समितीच्या पुरस्कृत ‘लव्ह जिहाद’ ग्रंथात सांगितल्याप्रमाणे सर्व प्रकारचे आध्यात्मिक स्तरावरील उपाय चालू करण्यात आले. प्रथम तरुणीने विरोध केला; पण ७ – ८ घंट्यांनंतर ती हळूहळू सकारात्मक होऊ लागली. (‘लव्ह जिहाद’च्या जाळ्यात अडकलेल्या तरुणींना त्यातून बाहेर काढण्यासाठी प्रबोधनपर ग्रंथ प्रकाशित करणार्‍या हिंदु जनजागृती समितीचे आभार ! – संपादक दैनिक सनातन प्रभात)

४. तिला ‘लव्ह जिहाद’चा ग्रंथ वाचायला दिला, तसेच सामाजिक माध्यमांवरील ‘लव्ह जिहाद’विषयीची माहिती आणि चित्रीकरण दाखवले. त्यानंतर तिचे मतपरिवर्तन झाले.

५. तरुणी म्हणाली, ‘‘२० डिसेंबरला निकाहची सिद्धता झाली असल्याने मला मुलाची आई पाठवत नव्हती. केवळ वडिलांचा चेहरा पाहून येण्यास सांगितले.’’ (धर्मांधांची हिंदुद्वेषी मनोवृत्ती जाणा ! – संपादक दैनिक सनातन प्रभात)

६. या वेळी तरुणीच्या आईलाही आध्यात्मिक उपाय करण्यास सांगण्यात आले. तरुणी आणि तिची आई यांना धर्मांधाने दिलेल्या साड्या, तसेच वस्तू जाळून नष्ट केल्यावर दोघींमध्ये सकारात्मक पालट होत असल्याचे दिसू लागले. (धर्मांध विविध वस्तूंच्या माध्यमांतून हिंदूंचे कसे वशीकरण करून घेतात, हे या उदाहरणावरून लक्षात येते ! – संपादक दैनिक सनातन प्रभात)

७. आता ती तरुणी तिच्या आई-वडिलांच्या घरी परतली आहे. धर्मांधाने केलेला त्यांचा विवाह नोंदणी अर्ज रहित करण्यासाठी, तसेच तरुणीचे शैक्षणिक, तसेच अन्य दाखले अन् भ्रमणभाष त्याच्या तावडीतून परत मिळावे; म्हणून हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्ते हे पुढील कायदेशीर साहाय्य करत आहेत. (‘लव्ह जिहाद’च्या विळख्यात अडकलेल्या तरुणीच्या सुटकेसाठी शेवटपर्यंत चिकाटीने प्रयत्न करणार्‍या हिंदुत्वनिष्ठांचे अभिनंदन ! सर्व साहित्य मिळेपर्यंत हा लढा चालूच ठेवून तरुणीला न्याय मिळवून द्या ! – संपादक दैनिक सनातन प्रभात)

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *