Menu Close

हिंदु मंदिरात हस्तपेक्ष करण्याचा अधिकार सरकार आणि न्यायालय यांना नाही ! – स्वामी परिपूर्णानंद महाराज, तेलंगणा

‘हिंदु देवस्थानांना सेक्युलर करण्याचे षड्यंत्र !’ या विषयावर ‘ऑनलाईन’ विशेष संवाद !

हिंदु मंदिरांच्या व्यवस्थापन समितीच्यांमध्येही अन्य धर्मीयांनी घुसखोरी केली आहे. हिंदु मंदिरांच्या नियमांचे उल्लंघन केले जात आहे. जे निधर्मी लोक हिंदु मंदिरांचा कारभार चालवू पाहत आहेत, तेच हिंदूंच्या देवी-देवतांना ‘सैतान’ मानतात. मंदिर परिसराजवळ अन्य धर्मीय आपली दुकाने थाटतात, मात्र मशिदी आणि चर्च यांच्या जवळून हिंदूंच्या उत्सवांची मिरवणूक निघाली, तर त्याला विरोध केला जातो. ‘हलाल’वर बंदी घाला, हिंदूंच्या उत्सवांच्या मिरवणूकांना स्वातंत्र्य द्या, यांवर सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिले पाहिजेत; मात्र हिंदूंची मंदिरे अन्य धर्मीयांच्या ताब्यात देण्याचा निर्णय हिंदूंवर लादला जात आहे. हिंदूंच्या मंदिरांची संपत्ती, नियम यांमध्ये हस्तपेक्ष करण्याचा सरकार आणि सर्वोच्च न्यायालय यांना नाही, असे स्पष्ट प्रतिपादन तेलंगणा येथील स्वामी परिपूर्णानंद महाराज यांनी केले. हिंदु जनजागृती समिती आयोजित ‘हिंदु देवस्थानांना सेक्युलर करण्याचे षड्यंत्र !’ या ‘ऑनलाईन’ विशेष संवादात ते बोलत होते.

‘हिंदु फ्रंट फॉर जस्टिस्’चे प्रवक्ता अधिवक्ता विष्णु शंकर जैन म्हणाले की, सरकार कोणत्याही प्रकारे हिंदूंच्या मंदिरांना नियंत्रणात ठेऊ शकत नाही. भक्त आणि भाविक जो पैसा हिंदूंच्या मंदिरात अर्पण करतात, सरकार तो पैसा इतर धर्मीयांसाठी कसा काय वापरू शकते ? हा हिंदूंच्या बाबतीत केलेला विश्‍वासघात आणि घोटाळा आहे. मंदिरांत फक्त देवतांचे नियम चालणार. हिंदूंच्या मंदिर व्यवस्थापनात अन्य धर्मीय हस्तक्षेप करून हिंदूंची मंदिरे भ्रष्ट करत आहेत. संविधानातील अनुच्छेद 26 नुसार ‘हिंदूंना आपल्या मंदिरांची व्यवस्था पाहण्याचा पूर्ण अधिकार आहे’, तसेच अनुच्छेद 25 नुसार ‘हिंदूंना आपली धार्मिक स्वतंत्रता अबाधित ठेऊन धर्म आपल्या पद्धतीने जगण्याचा अधिकार आहे.’ या विषयी हिंदूंचे म्हणणे सर्वोच्च न्यायालयात मांडणार असून, जर न्यायालयाने म्हणणे ऐकले नाही, तर जनतेमध्ये जागृती करून हिंदूंचा आवाज लोकप्रतिनिधींद्वारे संसदेत पोचवणार असल्याचेही अधिवक्ता जैन यांनी सांगितले.

कर्नाटक येथील अधिवक्ता श्रीहरी कुत्स म्हणाले की, अन्य धर्मीयांना मंदिर परिसरात दुकाने थाटायला दिली जात आहेत. मशिद परिसरात हिंदूंना दुकाने चालवू दिली जातील का ? मंदिरांना प्रेक्षणीय, पर्यटन स्थळाप्रमाणे सरकार पाहत आहे, हे थांबले पाहिजे. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे प्रवक्ता श्री. नरेंद्र सुर्वे म्हणाले की, मंदिरे ही धर्माची आधारशीला आहे. विविध सरकारांनी मंदिरे अधिग्रहीत करून मंदिरांना लुटण्याचा प्रारंभ केला. अनेक मंदिरांच्या भूमीवर अतिक्रमण करून ही भूमी हडप केली. मंदिरांच्या धनाचा गैरवापर हज यात्रांना अनुदान देणे यांसह अनेक गोष्टींसाठी केला गेला. आता त्यांनी धार्मिक परंपरामध्ये हस्तक्षेप करायला प्रारंभ केला आहे. हिंदूंच्या मंदिर संस्कृतीला नष्ट करण्यासाठी एका सुनियोजित षड्यंत्राद्वारे प्रयत्न केले जात आहेत, हे वेदनादायी असून यामुळे हिंदूंच्या मनात असंतोष निर्माण होत आहे. हिंदू समाज हे अधिक काळ आता सहन करणार नाही.

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *