‘हलाल’ प्रमाणपत्र व्यवस्था धर्मनिरपेक्ष भारतात बंद करा ! December 26, 2021 Share On : ‘मलकापूर किराणा व्यापारी संघटने’चे शाहूवाडी नायब तहसीलदारांना निवेदन शाहूवाडी नायब तहसीलदार रवींद्र मोरे (उजवीकडे) यांना निवेदन देतांना मलकापूर किराणा व्यापारी संघटनेचे व्यापारी आणि हिंदुत्वनिष्ठ मलकापूर – सध्या मुसलमान धर्मियांकडून भारतात प्रत्येक वस्तू इस्लामनुसार वैध म्हणजे ‘हलाल’ असण्याची मागणी केली जात आहे. हिंदूबहुल भारतात हिंदूंवर ही बळजोरी करण्याचे कारण काय ? तरी धर्मनिरपेक्ष भारतात ‘हलाल’ प्रमाणपत्र व्यवस्था बंद करावी, या मागणीचे निवेदन मलकापूर किराणा व्यापारी संघटनेच्या वतीने शाहूवाडी नायब तहसीलदार रवींद्र मोरे यांना देण्यात आले. या वेळी तहसीलदारांनी या संदर्भात अधिक माहिती घेऊन सदरचे निवेदन पंतप्रधान कार्यालयाकडे पाठवत असल्याचे सांगितले. (‘हलाल’ प्रमाणपत्राच्या विरोधात भूमिका घेणार्या ‘मलकापूर किराणा व्यापारी संघटने’चे अभिनंदन ! प्रत्येक संघटनेने याप्रमाणे त्यांच्या स्तरावर प्रयत्न करणे आवश्यक आहे ! – संपादक दैनिक सनातन प्रभात) या वेळी व्यावसायिक श्री. चेतन शहा, श्री. महेश विभुते, सर्वश्री अशोक देशमाने, केतन गांधी, समीर धनलोभे, विजय गांधी, हिंदुत्वनिष्ठ श्री. चारुदत्त पोतदार, श्री. रोहित पास्ते, श्री. संजय चव्हाण, हिंदु जनजागृती समितीचे श्री. प्रसाद कुलकर्णी आणि श्री. सुधाकर मिरजकर, वैद्य संजय गांधी, श्री. आनंद लोंढे, श्री. जितेंद्र पंडित यांसह २७ जण उपस्थित होते. Tags : Featured NewsRelated Newsमाता जिजाबाईंप्रमाणे मुलांमध्ये संस्कारांचे बीजारोपण करा – पू. साध्वी ॠतंभरा January 10, 2025पुणे येथे दत्त मंदिराजवळच चादर टाकून अनधिकृतपणे उभारलेली ३ थडगी हिंदुत्वनिष्ठांनी हटवली January 9, 2025सांकवाळ येथील ‘फ्रंटीस पीस ऑफ सांकवाळ’ या वारसा स्थळी फेस्ताचे आयोज करण्यास अनुमती देऊ नका January 8, 2025 Leave a Reply Cancel replyYour email address will not be published. Required fields are marked *Comment * Name * Email * Website Save my name, email, and website in this browser for the next time I comment.
पुणे येथे दत्त मंदिराजवळच चादर टाकून अनधिकृतपणे उभारलेली ३ थडगी हिंदुत्वनिष्ठांनी हटवली January 9, 2025
सांकवाळ येथील ‘फ्रंटीस पीस ऑफ सांकवाळ’ या वारसा स्थळी फेस्ताचे आयोज करण्यास अनुमती देऊ नका January 8, 2025