Menu Close

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनांना आमदारांचा सकारात्मक प्रतिसाद !

मुंबई – मुंबईत २२ डिसेंबरपासून राज्य विधीमंडळाच्या  हिवाळी अधिवेशनास प्रारंभ झाला आहे. अधिवेशन काळात महत्त्वपूर्ण विषयांवर विधीमंडळात चर्चा होत असते. यानिमित्ताने हिंदु जनजागृती समितीची भूमिका आणि मागणी असलेले विविध विषय यांसंदर्भातील निवेदन हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांच्यासह श्री. सागर चोपदार अन् श्री. बळवंत पाठक यांनी आमदारांना दिले. यामध्ये पारोळा (जिल्हा जळगाव) किल्ल्याची दुरवस्था, विशाळगडावरील अतिक्रमण, राजापूर येथील धोकादायक पुलाची दुरूस्ती, रत्नागिरी येथील लोकमान्य टिळक यांच्या निवासस्थानाची दुरवस्था आणि अन्य विषय यांचा समावेश आहे. या वेळी सर्वांना ‘सनातन पंचांग २०२२’ भेट देण्यात आले. या भेटीत संपर्क झालेल्या आमदारांनी समितीच्या निवेदनांविषयी सकारात्मक प्रतिसाद दिला. त्याविषयीचे संक्षिप्त विवरण येथे देत आहोत…..

पारोळा (जिल्हा जळगाव) किल्ल्याच्या संदर्भात जिल्हाधिकारी अन् संबंधित अधिकारी यांची बैठक घेऊ ! – आमदार चिमणराव पाटील, शिवसेना

आमदार चिमणराव पाटील (डावीकडे) यांना निवेदन देतांना सुनील घनवट

शिवसेनेचे आमदार चिमणराव पाटील यांना ‘पारोळा (जिल्हा जळगाव) येथील भुईकोट किल्ल्याची पुरातत्व खाते आणि जिल्हा प्रशासन यांच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे झालेली दुरवस्था’ याविषयीचे निवेदन देण्यात आले. त्या वेळी आमदार पाटील यांनी पारोळा किल्ल्याच्या संदर्भात जिल्हाधिकारी आणि संबंधित खात्याचे अधिकारी यांची लवकरच बैठक घेण्याचे आश्वासन दिले. तसेच ‘हलाल जिहाद’च्या समस्येविषयी पंतप्रधानांना पत्र पाठवणार असल्याचे सांगितले.

लोकमान्य टिळकांच्या जन्मस्थानाच्या संवर्धनासाठी निधी संमत ! – उदय सामंत, उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री, महाराष्ट्र

उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत (डावीकडे) यांना निवेदन देतांना सुनील घनवट

महाराष्ट्राचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांना समितीकडून राजापूर येथील धोकादायक पुलाची दुरुस्ती, लोकमान्य टिळक यांच्या रत्नागिरी येथील जन्मस्थानाची झालेली दुरवस्था या विषयांचे निवेदन देण्यात आले. या वेळी लोकमान्य टिळकांच्या जन्मस्थानाच्या संवर्धनासाठी निधी संमत केल्याची माहिती मंत्री उदय सामंत यांनी दिली.

राजापूर येथील पुलाच्या दुरुस्तीच्या प्रक्रियेसाठी प्रयत्न करू ! – आमदार राजन साळवी, शिवसेना

शिवसेनेचे आमदार राजन साळवी (उजवीकडे) यांना ‘सनातन पंचांग २०२२’ भेट देतांना सुनील घनवट आणि सागर चोपदार

शिवसेनेचे आमदार राजन साळवी यांना ‘राजापूर तालुक्यातील सागरी महामार्गावरील दांडे-अणसुरे या धोकादायक पुलाची तत्परतेने दुरुस्ती करण्यात यावी’, ‘रत्नागिरी येथील लोकमान्य टिळकांच्या जन्मस्थानाचे संवर्धन’ या विषयांचे निवेदन देण्यात आले. या वेळी राजापूर येथील पुलाच्या संदर्भात पुढील प्रक्रियेसाठी प्रयत्न करणार असल्याचे आमदार साळवी यांनी सांगितले.

‘हलाल जिहाद’ या समस्येवर कृती करेन ! – नामदेव ससाणे, आमदार, भाजप

आमदार नामदेव ससाणे (डावीकडे)

यवतमाळ येथील भाजपचे आमदार नामदेव ससाणे यांना हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘विशाळगडावरील अतिक्रमण’ या विषयाचे निवेदन देण्यात आले, तसेच भारतामध्ये समांतर अर्थव्यवस्था निर्माण करणारे हलाल प्रमाणपत्र रहित करण्याविषयी चर्चा करण्यात आली. या वेळी ‘हलाल जिहाद’ या विषयाचे निवेदन द्या त्यावर कृती करीन’, असे आश्वासन आमदार ससाणे यांनी दिले.

विशाळगडावरील अतिक्रमणाच्या संदर्भात लक्ष घालीन ! – एकनाथ शिंदे, नगरविकासमंत्री

नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे (उजवीकडे) यांना ‘सनातन पंचांग २०२२’ भेट देतांना सुनील घनवट

नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांना ‘विशाळगडावरील अतिक्रमण’ विषयाचे निवेदन दिल्यानंतर त्यांनी त्वरित कोल्हापूर जिल्हाधिकार्‍यांशी संवाद साधला. तसेच गडावरील अनधिकृत बांधकाम आणि अन्य समस्या यांवर चर्चा करून माहिती घेतली. ‘विशाळगडावरील अतिक्रमणाच्या संदर्भात लक्ष घालीन’, असेही सांगितले.

शिवसेना आमदार प्रकाश आबिटकर यांना निवेदन दिल्यावर त्यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद !

आमदार प्रकाश आबिटकर (मध्यभागी) यांना निवेदन देतांना सुनील घनवट आणि बळवंत पाठक

शिवसेनेचे आमदार प्रकाश आबिटकर यांना विशाळगडावरील अतिक्रमणाविषयी निवेदन देण्यात आले. या वेळी ‘हा विषय आमच्या जिल्ह्यातील असून छत्रपती शिवाजी महाराज आणि गड-किल्ले हा अस्मितेचा विषय आहे’, या दृष्टीने मी या विषयात लक्ष घालीन’, असे आश्वासन त्यांनी दिले. या वेळी समितीचे सुनील घनवट आणि बळवंत पाठक उपस्थित होते.

हलाल प्रमाणपत्राच्या विषयात केंद्र सरकारने लक्ष घालावे ! – महेश लांडगे, आमदार, भाजप

आमदार महेश लांडगे (डावीकडे) यांना ‘सनातन पंचांग २०२२’ भेट देतांना सुनील घनवट

विशाळगडावरील अतिक्रमणाविषयी भाजपचे आमदार महेश लांडगे यांनाही निवेदन देण्यात आले. हलाल प्रमाणपत्राचा विषय ऐकल्यावर ‘हे गंभीर असून त्यावर त्वरित नियंत्रण आणले पाहिजे. यात केंद्र सरकारने लक्ष घालावे’, असे ते म्हणाले. या वेळी त्यांना ‘सनातन पंचांग २०२२’ भेट देण्यात आले.

अध्यात्म, धर्म आणि राष्ट्ररक्षण विषयक ग्रंथांच्या प्रसारासाठी सहकार्य करू ! –  प्रकाश फातर्फेकर, आमदार, शिवसेना

आमदार प्रकाश फातर्फेकर (डावीकडे) यांना ‘सनातन पंचांग २०२२’ भेट देतांना सुनील घनवट

शिवसेनेचे आमदार प्रकाश फातर्फेकर यांना अध्यात्म, धर्म आणि राष्ट्ररक्षण विषयक ग्रंथ दाखवण्यात आले. या वेळी आमदारांनी ‘ग्रंथालयांच्या संदर्भात अभ्यास करून सहकार्य करता येईल, असे पाहू’, असे आश्वासन दिले.

हिंदु जनजागृती समितीच्या निवेदनातील सूत्रे अधिवेशनात चर्चेच्या वेळी उपस्थित करीन ! – राजेश टोपे, सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री

सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री राजेश टोपे

राज्याचे सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री राजेश टोपे यांना हिंदु जनजागृती समितीकडून ‘क्लिनिकल एस्टॅब्लिशमेंट ॲक्ट २०१०’ या विषयाचे निवेदन देण्यात आले. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगडचे संघटक सुनील घनवट यांनी खासगी रुग्णालयांकडून रुग्णांची होत असलेली पिळवणूक त्यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यावर राजेश टोपे यांनी ‘तुमच्या निवेदनातील महत्त्वाची सूत्रे या विधेयकाच्या चर्चेच्या वेळी उपस्थित करीन’, असे आश्वासन दिले. या वेळी टोपे यांना ‘सनातन पंचांग २०२२’ भेट देण्यात आले.

विशाळगडावरील समस्यांच्या संदर्भात स्वतः लक्ष घालीन ! – अनिल बाबर, आमदार, शिवसेना

आमदार अनिल बाबर (मध्यभागी) यांना ‘सनातन पंचांग २०२२’ भेट देतांना सुनील घनवट समवेत आणि सागर चोपदार

शिवसेनेचे आमदार अनिल बाबर यांची भेट समितीचे सुनील घनवट, सागर चोपदार आणि बळवंत पाठक यांनी घेतली. या भेटीत त्यांना विशाळगडावरील अतिक्रमण, विजयदुर्ग किल्ल्याची दुरावस्था या विषयांचे निवेदन देण्यात आले. ‘विशाळगडावरील अनधिकृत बांधकाम, किल्ले आणि मंदिरे यांची दुरवस्था या समस्या धक्कादायक आहेत. त्या सोडवण्यासाठी प्रयत्न करू’, असे आश्वासन बाबर यांनी या वेळी दिले. या वेळी त्यांना ‘सनातन पंचांग’ भेट देण्यात आले.

हिंदु जनजागृती समिती धर्माचे कार्य करत आहे ! – शिवसेनेचे खासदार हेमंत पाटील 

उजवीकडून खासदार हेमंत पाटील, राज्यमंत्री शंभूराज देसाई यांना ‘सनातन पंचांग २०२२’ भेट देतांना सुनील घनवट

शिवसेनेचे खासदार हेमंत पाटील यांनी ‘हलाल प्रमाणपत्रा’च्या संदर्भातील विषय ऐकून त्याविषयी लोकसभेत विषय मांडण्याची सिद्धता दर्शवली. ‘जिम जिहाद’ या माध्यमातून नवीन संकट निर्माण झाले असून ते गावागावांत पोचले आहे. व्यायामाचे प्रशिक्षण देतांना पुरुषांना प्रशिक्षण देण्यासाठी पुरुष आणि महिलांना प्रशिक्षण देण्यासाठी महिला असायलाय हव्यात. तुमचे कार्य संस्कारक्षम पिढी निर्माण करणारे आहे. हे काय चालू ठेवावे. हे धर्माचे कार्य आहे.

रेवदंडा-नागोठणे पुलाच्या दुरवस्थेविषयी कार्यवाही करू ! – भाजपचे आमदार प्रशांत ठाकूर, पनवेल

आमदार प्रशांत ठाकूर

भाजपचे आमदार प्रशांत ठाकूर यांना रेवदंडा-नागोठणे पुलाच्या दुरवस्थेविषयीचे निवेदन देण्यात आले. निवेदनातील सूत्रांवर सुनील घनवट आणि सागर चोपदार यांनी त्यांच्यासमवेत चर्चा केली. निवेदनाचा अभ्यास करून योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन ठाकूर यांनी या वेळी दिले.

शिवसेनेचे नेते प्रतापराव जाधव(डावीकडे) यांना ‘हलाल प्रमाणपत्र’ या विषयाचे निवेदन देण्यात आले.

भाजपचे नेते आणि आमदार सुधीर मुनगंटीवार (उजवीकडे) यांना निवेदन दिल्यानंतर त्याविषयी चर्चा करतांना सुनील घनवट आणि सागर चोपदार

Related News

0 Comments

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *