‘सारेगामा म्युझिक’ने ट्वीटद्वारे दिली माहिती !
|
नवी देहली – ‘मधुबन में राधिका नाचे रे’ या गीतावर अश्लील नृत्य करतांना दाखवून श्रीकृष्णाची निस्सीम भक्त राधेचा अवमान करण्यात आला होता. भारतभरातील हिंदूंनी या विरोधात व्यापक स्तरावर आंदोलन उभारले आणि या गीतावर बंदी आणण्याची मागणी केली होती. या प्रखर विरोधापुढे या गीताचे निर्माते ‘सारेगामा म्युझिक’ नमले असून त्यांनी हे गीत पुढील ३ दिवसांत सर्व माध्यमांवरून हटवले जाईल, असे कळवले आहे. त्यांनी एका ट्वीटद्वारे याची माहिती दिली आहे. ट्वीटमध्ये म्हटले आहे की, देशवासियांच्या भावनांचा आम्हाला आदर असून आम्ही या गीताला मागे घेत आहोत. असे असले, तरी ‘सारेगामा म्युझिक’ने हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्यामुळे हिंदूंची क्षमा मात्र मागितलेली नाही. याविषयी हिंदूंमध्ये रोष आहे.
Announcement: ? pic.twitter.com/lOJotcd04p
— Saregama (@saregamaglobal) December 26, 2021
या गीताला मथुरेतील संतांनीही तीव्र विरोध केला होता. मध्यप्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनीही हे गीत न हटवल्यास दिग्दर्शक शाकिब तोशी आणि अभिनेत्री सनी लिओनी यांच्या विरोधात कारवाई करण्याचे सूतोवाच केले होते.