Menu Close

हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक सुनील घनवट यांच्या अकोला, बुलढाणा आणि धुळे या जिल्ह्यांतील ‘संपर्क अभियाना’ला हिंदुत्वनिष्ठांचा उत्स्फूर्त प्रतिसाद !

अकोला – हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांनी अकोला, बुलढाणा, तसेच धुळे जिल्ह्यांतील संत, हिंदुत्वनिष्ठ आणि अधिवक्ते यांच्या भेटी घेतल्या. त्या वेळी सर्वांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. त्याचा वृत्तांत येथे देत आहोत.

अकोला

हिंदु तरुणांचे संघटन करणे, ही काळाची गरज ! – ह.भ.प. उमेश महाराज आर्य, अकोला

हिंदु तरुणांचे संघटन करणे, ही काळाची आवश्यकता आहे, हे कार्य हिंदु जनजागृती समिती चांगल्या प्रकारे करत आहे. या प्रयत्नांतूनच आणि परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांच्या कृपेने हिंदु राष्ट्राची स्थापना होणारच आहे, याची निश्चिती आहे.

हिंदु राष्ट्राच्या कार्यात योगदान देईन ! – शशिकांत चोपडे, शिवसेना नगरसेवक आणि स्थायी समिती सदस्य, अकोला.

‘हिंदु राष्ट्राची आवश्यकता’ हा विषय समजून घेऊन हिंदूंचे प्रभावी संघटन करण्याच्या कार्यात योगदान देईन, तसेच तरुण मुलांसाठी एका कार्यशाळेचेही आयोजन करीन.

बुलढाणा

‘हिंदूंवर होणार्‍या आघातांवर ‘हिंदु राष्ट्राची स्थापना’ हाच एकमेव पर्याय आहे ! – अधिवक्ता उदय सुधाकर आपटे, खामगाव 

खामगाव येथील अधिवक्ते सर्वश्री उदय आपटे, तरुण मोहता, राहुल सोहनी यांनी ‘हलाल प्रमाणपत्र’ हा विषय ऐकल्यावर ‘त्या माध्यमातून देशात निर्माण होणार्‍या समांतर अर्थव्यवस्थेला संघटितपणे विरोध करू’, असे सर्वांनी सांगितले.

मलकापूर (बुलढाणा) येथील भाजपचे माजी आमदार श्री. चैनसुख संचेती यांनी हिंदु जनजागृती समितीचे समाजसाहाय्य, राष्ट्ररक्षण आणि धर्मजागृती यांविषयीचे कार्य समजून घेतले. स्वतःला राष्ट्रकार्य करतांना आलेले अनुभवही त्यांनी सांगितले.

माजी आमदार चैनसुख संचेती यांना ‘सनातन पंचांग २०२२’ देतांना सुनील घनवट आणि अन्य मान्यवर

नांदुरा (बुलढाणा) येथे काही धर्मप्रेमींनी ‘हिंदु धर्मावर होणारे आघात आणि त्यासाठी संघटितपणे करावयाचे प्रयत्न’ हा विषय ऐकून घेतला, तसेच शंकांचे निरसन करवून घेतले.

‘श्री. सुनील घनवट आल्यामुळे कार्याला नवी दिशा मिळाली’, असे मत अनेक हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या पदाधिकार्‍यांनी व्यक्त केले. या वेळी सर्वांनाच ‘सनातन पंचाग २०२२’ भेट देण्यात आले.


धुळे

भविष्यात हिंदूसंघटनाचे कार्य करायला हवे ! – संजय शर्मा, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, धुळे जिल्हाप्रमुख

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धुळे जिल्हा विभागप्रमुख श्री. संजय शर्मा आणि त्यांच्या परिवाराला ‘सनातन पंचांग २०२२’ भेट देतांना श्री. सुनील घनवट

धुळे येथे गोरक्षणाचे कार्य प्रभावीपणे चालू आहे. धर्मांधांकडून मोठ्या प्रमाणावर गोतस्करी होत आहे. भविष्यात विविध माध्यमांतून प्रभावीपणे हिंदूसंघटनाचे कार्य करायला हवे.

लव्ह जिहाद आणि धर्मांतर यांविरोधात ग्रामीण भागातील हिंदूंना संघटित करण्याचा प्रयत्न करू ! – राम भदाणे, नगाव एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष आणि जिल्हा परिषद सदस्य, धुळे

लव्ह जिहाद आणि धर्मांतर यांविषयी जनजागृती करण्यासाठी ग्रामीण भागात हिंदु धर्मप्रेमी युवकांना संघटित करण्याचा प्रयत्न करू. लव्ह जिहादच्या विरोधात मोठ्या प्रमाणावर जनजागृती व्हायला हवी. माझ्याशी जोडलेल्या कार्यकर्त्यांना प्रभावीपणे धर्मकार्य कसे करावे ? याविषयी तुम्ही प्रशिक्षण द्या.

हिंदु जनजागृती समिती करत असलेले कार्य सध्याच्या काळात आवश्यक ! – राजीव कृष्णजी महाराज झा, भागवतकार, शामसुंदर गोशाळा, नकाने, धुळे

श्री. राजीव कृष्णजी महाराज झा यांना ‘सनातन पंचांग २०२२’ भेट देतांना श्री. सुनील घनवट

हिंदु जनजागृती समिती करत असलेले कार्य सध्याच्या काळात आवश्यक असून तुम्हा सर्वांचा त्याग मोठा आहे. भागवत कथांच्या माध्यमातून लव्ह जिहाद, तसेच राष्ट्र अन् धर्म यांवरील आघातांविरोधात जनजागृती करू. (झा यांनी समितीचे कार्य आस्थेने जाणून घेतले.)

हलालच्या माध्यमातून चालू असणारा ‘आर्थिक जिहाद’ राष्ट्रासमोरील मोठे संकट ! – प्रदीप कर्पे, महापौर, धुळे 

धुळे येथील महापौर प्रदीप कर्पे यांना ‘सनातन पंचांग २०२२’ भेट देतांना सुनील घनवट

‘हलाल प्रमाणपत्रा’च्या माध्यमातून चालू असलेला ‘आर्थिक जिहाद’ हा अत्यंत गंभीर विषय असून ते राष्ट्रासमोरील मोठे संकट आहे. यासंदर्भात मोठ्या प्रमाणावर जनजागृती होणे अत्यंत आवश्यक आहे. ‘हलाल प्रमाणपत्र’ व्यवस्थेच्या विरोधातील लढ्यामध्ये व्यापारी आणि नगरसेवक यांना कृतीशील करण्यासाठी बैठकीचे आयोजन करू.

हिंदु जनजागृती समिती अविरतपणे करत असलेले धर्मकार्य कौतुकास्पद ! – जी.बी. मोदी, सनदी लेखापाल, धुळे

हिंदु जनजागृती समिती अविरतपणे करत असलेले धर्मकार्य कौतुकास्पद असून या कार्यात राष्ट्र आणि धर्मप्रेमी व्यावसायिकांना जोडण्याचा प्रयत्न करीन.

‘हलाल प्रमाणपत्र’ या आर्थिक जिहादाविषयी जनजागृती करण्यासाठी धुळ्यातील सर्व व्यापारी आणि नगरसेवक यांची लवकरच बैठक घेऊ. – अनुप अग्रवाल, भाजप जिल्हाध्यक्ष, धुळे

या वेळी सर्वांनाच ‘सनातन पंचांग २०२२’ भेट देण्यात आले.


मुंबई येथे हिंदु जनजागृती समितीकडून कृषीमंत्री आणि रोजगार हमीमंत्री यांना विविध विषयांवर निवेदने !

रोजगार हमी, फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे (डावीकडे) यांना निवेदन देतांना सुनील घनवट, सागर चोपदार, बळवंत पाठक

कृषीमंत्री दादासाहेब भुसे (डावीकडे) यांना ‘सनातन पंचांग २०२२’ भेट देतांना श्री. सुनील घनवट, श्री. बळवंत पाठक

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *