Menu Close

उत्तरप्रदेशमध्ये मंदिराजवळ धर्मांधांना दारू पिण्यापासून रोखल्याने रा.स्व. संघाच्या कार्यालयावर आक्रमण !

  • २ कार्यकर्ते गंभीररित्या घायाळ

  • भारतमातेचे चित्र फाडले !

  • १० जणांना अटक

  • उत्तरप्रदेशमध्ये भाजपचे सरकार असतांना हिंदूंच्या संघटनांच्या कार्यालयावर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांवर अशा प्रकारची आक्रमणे होणे हिंदूंना अपेक्षित नाही ! – संपादक दैनिक सनातन प्रभात
  • अशा धर्मांधांना पकडून त्यांना कठोरातील कठोर शिक्षा करण्यासाठी सरकारने प्रयत्न केले पाहिजेत ! – संपादक दैनिक सनातन प्रभात
घटनास्थळ

आगरा (उत्तरप्रदेश) – येथील आलमगंज चौकीजवळ राधाकृष्ण मंदिर आहे. येथे धर्मांधांकडून दारू पिऊन गोंधळ घालण्यात येत असे. या मंदिरासमोरच रा.स्व. संघाचे कार्यालयही आहे. संघाच्या कार्यकर्त्यांनी या धर्मांधांना दारू पिण्यास आणि गोंधळ घालण्यास रोखले. त्यावेळी ते तेथून गेले; मात्र काही वेळाने ५० ते ७० धर्मांध तेथे पोचले आणि संघाच्या कार्यालयावर दगडफेक केली. तसेच कार्यालयात घुसून तोडफोड केली आणि तेथील भारतमातेचे चित्र फाडून टाकले. या आक्रमणात विकास गुप्ता आणि शिवम् कुमार हे दोघे गंभीररित्या घायाळ झाले. या प्रकरणी आतापर्यंत १० जणांना अटक करण्यात आली आहे.

या घटनेविषयी येथील आमदार योगेंद्र उपाध्याय यांनी, ‘संघाच्या कार्यकर्त्यांना धर्मांध पकडून घेऊन गेले आणि त्यांना मारहाण केली. जर पुढील २४ घंट्यांमध्ये आरोपींवर कारवाई केली नाही, तर पोलिसांना त्याचे परिणाम भोगावे लागतील’, असे म्हटले आहे.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *