Menu Close

पैठण (संभाजीनगर) येथे ५३ जणांचा ख्रिस्ती धर्म त्यागून ‘हिंदु धर्मात पुनर्प्रवेश’ !

जालना – पैठण येथील संत एकनाथ महाराज समाधी मंदिरात (बाहेरील नाथमंदिर) २५ डिसेंबर या दिवशी मंठा (जिल्हा जालना) येथील १२ कुटुंबांतील ५३ महिला-पुरुष यांनी ख्रिस्ती पंथाचा त्याग केला आणि ते त्यांच्या मूळ हिंदु धर्मात परत आले. त्यानंतर २६ डिसेंबर या दिवशी स्थानिक काही ख्रिस्त्यांनी ‘ते ख्रिस्ती नव्हतेच’, असा कांगावा केला. (ख्रिस्त्यांना उठलेला पोटशूळ ! – संपादक दैनिक सनातन प्रभात)

१. धर्मजागरण विभाग आणि नाथवंशज यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. पैठणच्या ब्राह्मण सभेने यासाठी पुढाकार घेतला, तसेच पैठणच्या वेदशास्त्रसंपन्न पंडितांनी या धर्मविधीचे पौरोहित्य केले.

२. या वेळी संत एकनाथ महाराज यांचे १४ वे आणि १५ वे वंशज यांच्यासह पैठणच्या वेदशास्त्र संपन्न ब्रह्मवृंदांची उपस्थिती होती. या सर्व परिवारांचे स्वागत आणि पूजन ह.भ.प. नाथवंशज रावसाहेब महाराज गोसावी अन् कीर्तनमहर्षी प्रफुल्लबुवा तळेगावकर महाराज, तसेच नाथवंशज रघुनाथ महाराज गोसावी (पालखीवाले) यांनी केले.

३. याविषयी ब्राह्मण सभेचे अध्यक्ष सुयश शिवपुरी यांनी सांगितले की, ५३ ख्रिस्ती महिला आणि पुरुष यांनी पुन्हा हिंदु धर्मात येण्याची इच्छा व्यक्त केली असल्याने धार्मिक विधी करण्याचे नियोजन करण्यात आले.

४. ५३ ख्रिस्ती महिला-पुरुष यांनी हिंदु धर्मात पुनर्प्रवेश केल्यानंतर मंठा तालुक्यातील आणखी २२ ख्रिस्ती कुटुंबांतील जवळपास ६५ महिला-पुरुष यांनी ख्रिस्ती पंथाचा त्याग करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यामुळे ५ जानेवारी २०२२ या दिवशी धार्मिक मुहूर्तावर पैठण येथील नाथमंदिरातच हिंदु धर्मात पुनर्प्रवेश करण्याच्या विधीचे आयोजन करण्यात आले आहे. ब्राह्मण सभेच्या पुढाकाराने हा ‘पुनर्प्रवेश’ केला जाणार आहे.

५. हिंदु धर्मात पुनर्प्रवेश केलेल्या १४ जणांनी असे म्हटले आहे की, ‘आम्ही आधीपासून हिंदूच आहोत. आम्हाला देवदर्शनासाठी नेतो’, असे सांगून पैठणला नेले होते.

(म्हणे) ‘हा ख्रिस्तीविरोधी वातावरण निर्माण करण्याचा डाव !’

धूर्त बाटग्या ख्रिस्त्यांचा थयथयाट !

‘अल्फा ओमेगा ख्रिश्चन महासंघा’चे आशिष शिंदे म्हणाले की, हा ख्रिस्तीविरोधी वातावरण निर्माण करण्याचा डाव आहे. ख्रिसमसला हिंदुत्वनिष्ठ संघटना तेढ निर्माण करत आहेत. ते लोक ख्रिस्ती होते का ? ते पहावे लागेल. ख्रिस्ती होण्याचा विधी असतो. ख्रिस्त्यांची प्रार्थना त्यांना यावी लागते. (ख्रिस्ती मोठ्या प्रमाणात गरिबांना आमिषे दाखवून राजरोस धर्मांतर करतात, हे सर्वश्रुत आहे. हे ख्रिस्ती नसते, तर त्यांनी हिंदु धर्मात पुनर्प्रवेश का केला असता ? – संपादक दैनिक सनातन प्रभात)

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *