Menu Close

ट्विटरद्वारे विजयदुर्ग किल्ल्याच्या दुरवस्थेस उत्तरदायी असलेल्या अधिकार्‍यांवर कारवाईची मागणी

#Save_Vijaydurg_Fort या नावाने ‘ट्रेंड’

किल्ले विजयदुर्ग !

सिंधुदुर्ग – छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्याच्या निर्मितीमध्ये किल्ल्यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. ‘ज्याच्या हाती आरमार, त्याची समुद्रावर सत्ता,’ हे मर्म ओळखून छत्रपती शिवाजी महाराजांनी मोठ्या आरमाराची निर्मिती केली. छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे मावळे यांच्या पराक्रमाची साक्ष देणार्‍या जलदुर्गांपैकी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक जलदुर्ग म्हणजे विजयदुर्ग किल्ला ! दुर्दैवाने आज या किल्ल्याची स्थिती दयनीय झाली आहे. विजयदुर्ग किल्ल्याचे जतन, दुरुस्ती आणि संवर्धन होणे आवश्यक असून त्यासाठी सरकारच्या पुरातत्व विभागाने आवश्यक ती पावले उचलावीत, यासाठी २९ डिसेंबरच्या सायंकाळी धर्मप्रेमी अन् राष्ट्रप्रेमी यांनी ट्विटरवर #Save_Vijaydurg_Fort या नावाने ‘हॅशटॅग ट्रेंड’ (एखाद्या विषयावर ट्विटरवरून घडवली जाणारी चर्चा) केला. ट्वीट्स करणार्‍या विविध राज्यांतील धर्म आणि राष्ट्र प्रेमी यांनी विजयदुर्ग किल्ल्याच्या दुर्दशेसाठी उत्तरदायी असलेल्या पुरातत्व विभागाच्या अधिकार्‍यांवर कारवाई करण्याची मागणी केली.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *