Menu Close

(म्हणे) ‘मुसलमानांना संपवण्याचा प्रयत्न झाला, तर आम्ही लढा देऊ !’

ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह यांचे विषारी फुत्कार !

कालीचरण महाराज यांना अटक करण्यास भाग पाडणारे काँग्रेसी हे धर्मांधांना हिंदूंवर आक्रमण करण्याची चिथावणी देणार्‍या अभिनेते नसीरुद्दीन शाह यांच्याविरोधात चकार शब्दही काढत नाहीत, हे लक्षात घ्या ! – संपादक दैनिक सनातन प्रभात

ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह

मुंबई – ‘देशात २० कोटी मुसलमान आहेत. त्यांना तुम्ही (हिंदू) रातोरात नष्ट करू शकत नाही. आमच्या पिढ्या येथेच जन्माला आल्या आणि येथेच मरण पावल्या. मी उघडपणे सांगू इच्छितो की, मुसलमानांवर आक्रमण झाले, तर ते केवळ राग निर्माण करणारे ठरेल. आम्ही या विरोधात लढा देऊ’, अशा प्रकारे भारतातील समस्त हिंदूंना धर्मांध आणि आक्रमक ठरवणारे फुत्कार ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह यांनी काढले. काही दिवसांपूर्वी हरिद्वार येथे संतमहंतांच्या झालेल्या धर्मसंसदेच्या संदर्भावरून ‘दी वायर’ या ‘वेब पोर्टल’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये नसीरुद्दीन शाह यांनी हिंदूंवर आक्रमण करण्यासाठी धर्मांधांना उघडपणे जणू चिथावणीच दिली आहे.

स्वत:मधील हिंदुद्वेष प्रगट करतांना अभिनेते शाह म्हणाले…

१. मुसलमानांना नरसंहाराची भीती दाखवून गृहयुद्धाचा धोका संभवेल, असे सांगितले जात आहे; मात्र दक्षिणपंथी (हिंदुत्ववादी) लोकच भारताला गृहयुद्धाकडे घेऊन जात आहेत. (धर्मांधांनी काश्मीरमध्ये हिंदूंचा वंशविच्छेद केला. गेली अनेक दशके क्षुल्लक कारणावरून धर्मांध हे देशभर दंगली घडवत आले आहेत. विविध प्रकारचे जिहाद करून ते हिंदूंना मुळापासून संपवण्यासाठी सतत प्रयत्नशील असतात. त्रिपुरामध्ये मशीद पाडल्याच्या अफवेवरून त्यांनी महाराष्ट्रात दंगली घडवल्याचे उदाहरण सर्वांच्या स्मरणात आहेच ! त्यामुळे भारतात गृहयुद्ध कोण भडकावत आहे, हे समजण्याइतपत हिंदू दूधखुळे नाहीत, हे शाह यांनी ध्यानात घ्यावे ! – संपादक दैनिक सनातन प्रभात)

२. केंद्रातील वर्तमान शासन मुसलमानांना दुय्यम दर्जाचे नागरिक ठेवू इच्छितात. (धादांत खोटे विधान करणारे नसीरुद्दीन शाह ! – संपादक दैनिक सनातन प्रभात)

३. सद्यःस्थितीत एका पोलीस अधिकार्‍याच्या मृत्यूपेक्षा एका गायीचा मृत्यू चर्चेचा विषय केला जातो, हे विचार करायला लावणारे सूत्र आहे. (कोट्यवधी गोमातांची हत्या करून धर्मांध हिंदूंच्या धार्मिक भावना दुखवतात, हिंदु युवतींना लव्ह जिहादच्या जाळ्यात ओढून त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त करतात. यावर एक अवाक्षरही न काढणार्‍या शाह यांचा हा दुटप्पीपणाच होय ! – संपादक दैनिक सनातन प्रभात) भडकावू भाषण देणार्‍यांना अटक होणार कि नाही, हे पोलिसांना आदेश कोण देत आहे, यावरून निश्‍चित होते.

४. माझ्या जीवनात राजकारण इतक्या खालच्या पातळीवर कधीही आलेले नाही. माझ्या वडिलांनी पाकिस्तानला जाण्यास नकार दिला होता; मात्र आजच्या स्थितीला भारतात जन्माला आलेल्यांचे भवितव्य काय आहे ? हे माहिती नाही. (गेली सहस्रावधी वर्षे ‘वसुधैव कुटुम्बकम्’ची शिकवण अंगीकारणार्‍या भारतभूमीला नावे ठेवणारे नसीरुद्दीन शाह यांना भारतातून हव्या त्या देशात कायमचे निघून जाण्यापासून कुणी रोखले आहे ? – संपादक दैनिक सनातन प्रभात)

(म्हणे) ‘मोगलांनी राष्ट्रनिर्मितीचे कार्य केले !’

मोगलांच्या कथित अत्याचारांना वाढवून सांगितले जात आहे. प्रत्यक्षात त्यांनी कला, संस्कृती, संगीत आणि साहित्य यांना चालना देण्यासह किती इमारती बांधल्या ? (धर्मांधांनी हिंदूंचे किल्ले, देवळे, इमारती पाडून तिथे स्वतःच्या मशिदी आणि इमारती बांधल्या, हे आता लपून राहिलेले नाही; तर पुराव्यांसह पुढे आले आहे ! त्यामुळे वरील विधाने करून शाह हिंदूंना आता मूर्ख बनवू शकत नाहीत ! – संपादक) ‘मोगल भारताची निर्मिती करण्यासाठी आले होते’, असे अकलेचे तारेही या वेळी नसीरुद्दीन शाह यांनी तोडले. (खिलजी, बाबर, औरंगजेब आदी सर्वच क्रूर मोगल आक्रमकांनी हिंदु राज्ये, मंदिरे यांसह त्यांच्या स्त्रिया यांचे जीवन उद्ध्वस्त केले. हे मोगल राजे त्यांना राष्ट्रनिर्माते वाटत असतील, तर शाह यांना देशद्रोहीच म्हणावे लागेल ! – संपादक दैनिक सनातन प्रभात)

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *