भारताकडून तीव्र विरोध
भारतातील राज्यातील स्थानांची नावे पालटण्याचे धाडस चीन करतोच कसा ? चीनवर भारताचा धाक नाही का ? भारत सरकारने आता चीनमधील स्थानांची नावे पालटून त्याला जशास तसे उत्तर दिले पाहिजे ! – संपादक दैनिक सनातन प्रभात
नवी देहली – चीनने अरुणाचल प्रदेशातील १५ स्थानांची नावे पालटली आहेत. त्यावर भारताने तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करत ‘अरुणाचल प्रदेश भारताचा अविभाज्य भाग आहे. नाव पालटण्याने वस्तूस्थिती पालटत नाही. स्थानांची नावे पालटण्याचा प्रकार खपवून घेतला जाणार नाही’, असे म्हटले आहे. चीन सातत्याने अरुणाचल प्रदेश तिबेटचा भाग असल्याचा दावा करत आला आहे. तिबेटवर सध्या चीनचे नियंत्रण आहे.
China has ‘renamed’ around 15 places, which include eight townships, two rivers, four mountains and a mountain pass in Arunachal Pradesh, in Mandarinhttps://t.co/AVhwhzR7rh
— WION (@WIONews) December 31, 2021