Menu Close

हिंदुद्वेषी विनोदी कलाकार मुनव्वर फारूकी यांचा मुंबईतील कार्यक्रम रहित न केल्यास आंदोलनाची चेतावणी !

समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांचा तीव्र विरोध !

मुंबईच्या पोलीस आयुक्तांना पत्र पाठवून कार्यक्रम रहित करण्याची हिंदु जनजागृती समितीची मागणी

हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या न जाण्यासाठी सरकारने ईशनिंदा कायदा करावा !

मुनव्वर फारूकी

मुंबई – सातत्याने हिंदूंच्या देवतांचा अवमान करणारा हिंदुद्वेषी विनोदी कलाकार मुनव्वर फारूकी यांचा १ जानेवारी या दिवशी मुंबईमध्ये होणारा ‘धंदो’ नावाच्या कार्यक्रमाला समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. हिंदूंच्या धार्मिक भावनांना डावलून या कार्यक्रमाला अनुमती दिल्यास या विरोधात तीव्र आंदोलन करण्याची चेतावणी हिंदुत्वनिष्ठ संघटनांकडून देण्यात आली आहे. या प्रकरणी हिंदु जनजागृती समितीचे मुंबई, ठाणे आणि रायगड जिल्हा समन्वयक श्री. सागर चोपदार यांनी ३१ डिसेंबर या दिवशी मुंबईच्या पोलीस आयुक्तांना ‘मेल’द्वारे पत्र पाठवून मुनव्वर यांचा कार्यक्रम रहित करण्याची मागणी केली आहे. (अशी मागणी का करावी लागते ? – संपादक)

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने पाठवण्यात आलेल्या पत्रात म्हटले आहे की,

१. या कार्यक्रमाची तिकीट विक्री ‘ऑनलाईन’ लिंकच्या माध्यमातून होत आहे. मुनव्वर फारूकी यांची हिंदुद्वेषी आणि आक्षेपार्ह वक्तव्यांची पार्श्वभूमी पहाता, तसेच मुंबईतील सामाजिक आणि धार्मिक सलोखा टिकवून ठेवण्यासाठी त्यांचे कार्यक्रम रहित करावेत.

२. मुनव्वर यांनी जानेवारी २०२१ मध्ये मध्यप्रदेश येथील ‘मुनरो कॅफे’मधील एका कार्यक्रमात हिंदूंच्या देवता आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर अत्यंत आक्षेपार्ह टिपण्या केल्या होत्या. त्या वेळी मुनव्वर फारूकी यांना पोलिसांनी अटक केली होती. ३७ दिवस तो कारागृहात होता.

३. कार्यक्रमाची रितसर अनुमती न घेणे, कोरोनाच्या काळात नियम न पाळणे, हिंदूंच्या देवतांवर अत्यंत आक्षेपार्ह टीका करणे यांमुळे सत्र आणि उच्च न्यायालयाने त्यांचा जामीन फेटाळाला होता.

४. फेब्रुवारी २०२१ मध्ये इंदूर येथील कारागृहातून त्याची जामिनावर सुटका झाली आहे. या व्यतिरिक्त ‘सी.ए.ए. कायदा’, ‘ग्रोधा हत्याकांडातील कारसेवकांचा मृत्यू’ आदींविषयीही त्यांनी आक्षेपार्ह वक्तव्ये केली आहेत. त्यांच्या अनेक आक्षेपार्ह वक्तव्यांची माहिती आणि व्हिडिओ ‘यू-ट्यूब’वर उपलब्ध आहेत.

५. एकूणच हिंदुद्वेषी मुनव्वर फारूकी यांची यापूर्वीची वक्तव्ये पहाता त्यांच्या कार्यक्रमाला अनुमती देणे, हे पुन्हा नवीन गुन्हा करायला अनुमती देण्यासारखे आहे. या कार्यक्रमाला हिंदुत्वनिष्ठ संघटनांसह राष्ट्रप्रेमी नागरिकांचा तीव्र विरोध आहे.

६. मुनव्वर फारूकी यांच्या आक्षेपार्ह वक्तव्यांमुळे मुंबईत कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे या कार्यक्रमाचे आयोजक, सभागृहाचे व्यवस्थापक आणि प्रसारक यांना तात्काळ कार्यक्रमाला अनुमती नाकारल्याची नोटीस पाठवावी.

७. या कार्यक्रमांची अनुमती रहित न झाल्यास आम्हाला नाईलाजास्तव रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागेल. मुंबईत शांतता अबाधित राखण्यासाठी हे कार्यक्रम तात्काळ रहित करावेत.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *