लोकप्रतिनिधींचा सकारात्मक प्रतिसाद आणि धर्मकार्यात सहकार्य करण्याचे आश्वासन !
हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांनी डिसेंबरमध्ये रायगड जिल्ह्यातील आमदार, अधिवक्ता, उद्योजक आणि काही प्रतिष्ठित व्यक्ती यांच्या भेटी घेतल्या, तसेच हिंदुत्वनिष्ठ आणि धर्मप्रेमी यांच्या बैठका घेतल्या. या वेळी त्यांच्याकडून मिळालेला प्रतिसाद, तसेच मान्यवरांनी व्यक्त केलेले विचार याचा थोडक्यात वृत्तांत येथे देत आहोत.
विशाळगडावरील अतिक्रमणांविषयी मी स्वतः मुख्यमंत्र्यांशी बोलणार आहे ! – भरतशेठ गोगावले, आमदार, शिवसेना, महाड
सुनील घनवट यांनी आमदार भरतशेठ गोगावले यांना हिंदु जनजागृती समितीच्या विशाळगडावर झालेल्या अतिक्रमणाच्या विरोधातील मोहिमेविषयी सांगितले. त्या वेळी ‘याविषयी मी स्वतःहून मुख्यमंत्र्यांशी बोलीन’, असे आश्वासन त्यांनी दिले. ‘धर्म, अध्यात्म आणि राष्ट्र विषयक ग्रंथांसाठी आमदार निधीतून साहाय्य करीन’, असेही त्यांनी या वेळी सांगितले.
‘हलाल प्रमाणपत्रा’चा विषय सांगितल्यावर त्यांनी लगेचच महाड येथे उद्योगपतींची बैठक आयोजित केली. ‘हा विषय एवढा गंभीर असतांना कुणीच कसा आवाज उठवला नाही ? याचे मला आश्चर्य वाटते’, असे ते या वेळी म्हणाले.
हलाल प्रमाणपत्रा’ला विरोध करण्याचा महाड येथील उद्योजकांचा निर्धार !
या बैठकीत सुनील घनवट यांनी ‘हलाल प्रमाणपत्र’ घेण्याविषयीची भयावहता लक्षात आणून दिली. सर्व उद्योजक म्हणाले, ‘‘आम्ही महाडमधील सर्व उद्योजकांना एकत्र करून एक मोठी बैठक आयोजित करतो. आपण आम्हाला जागृत केले ते पुष्कळ चांगले झाले. आम्ही सर्व व्यापार्यांमध्ये जागृती करतो. ‘मुरली मनोहर पतसंस्थे’चे अध्यक्ष कुमार चंद्रकांत मेहता, महाड शहर शिवसेनाप्रमुख आणि रायगड जिल्हा अन्न आणि औषध नियंत्रण समितीचे सदस्य नितीन पावले, किराणा माल व्यापारी संघटनेचे अध्यक्ष गणेश जंगम आणि किरण संतोष थरवळ यांच्यासह महाड येथील मान्यवर उद्योजक या वेळी उपस्थित होते. महाड येथील किराणा माल व्यापारी संघटनेचे अध्यक्ष गणेश जंगम यांनी या वेळी सुनील घनवट यांचा सत्कार केला.
हिंदु जनजागृती समिती राष्ट्र आणि धर्म जागृतीचे कार्य करत आहे ! – सुरेंद्र म्हात्रे, विरोधी पक्षनेता, जिल्हा परिषद, रायगड
रायगड जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते सुरेंद्र म्हात्रे यांची भेट घेतली असता ते म्हणाले, ‘‘हिंदु जनजागृती समिती राष्ट्र आणि धर्म जागृतीचे कार्य करत आहे; बाकी कुणीच असे करत नाहीत. आपण या गावात मोठी धर्मजागृती सभा घेऊया. मी पूर्णपणे सहकार्य करीन. मी माझ्या निधीमधून काही राष्ट्र आणि धर्म विषयक ग्रंथ घेईन.’’
प्रखर धर्मप्रेमी सुरेंद्र म्हात्रे यांनी त्यांच्या गावात धर्मांतर होऊ नये, यासाठी प्रयत्न केले आहेत. अन्य पंथियांना गावात भाड्याने घर द्यायचे नाही, याविषयी जागृती केली आहे. धर्माविषयी कोणतीच तडजोड ते करत नाहीत. त्यांनी स्वतः खर्च करून मंदिर बांधले आहे आणि अनेक मंदिरांचा त्यांनी जीर्णोद्धार केला आहे.
खोपोली येथे उद्योजकांसाठी आयोजित बैठकीत ‘हलाल प्रमाणपत्रा’च्या गंभीर परिणामांविषयी जनजागृती !
जनार्दन जाधव, किशोर पडवळ आणि शशिकांत पाटील या धर्मप्रेमींनी खोपोली येथे बैठकीचे आयोजन केले होते आणि त्याविषयीचा प्रसारही त्यांनीच केला. या बैठकीत ३ नगरसेवक आणि २० उद्योजक उपस्थित होते. येथील धर्मप्रेमींच्या बैठकीसाठी लागणारे साहित्य, तसेच प्रोजेक्टर, विद्युत् आणि ध्वनी व्यवस्था विनामूल्य उपलब्ध करून दिली होती.
या बैठकीत सहभागी नगरसेवक संदीप पाटील म्हणाले, ‘‘आपण खोपोलीतील सर्व उद्योजकांची बैठक आयोजित करूया आणि पुष्कळ व्यापार्यांपर्यंत हा विषय नेण्यासाठी प्रयत्न करूया. आपण सर्वजण प्रत्येक मासालाही बैठक ठेवूया. आज किती छुप्या पद्धतीने कसे हे चालू आहे ? आपण आज आमच्यात ही जागृती केली, त्याविषयी धन्यवाद.’’
खोपोली येथील बैठकीत धर्मप्रेमींना मार्गदर्शन !‘आपण जो नामजप करतो तो जर सतत झाला, तर आपले ‘कर्म अकर्म’ होते. त्याचे पापसुद्धा लागत नाही आणि पुण्यही लागत नाही. देव कधीच कुणावर अन्याय करत नाही. खरेतर पूर्वजन्मातील प्रारब्ध कर्मानुसार प्रत्येकाला त्याचे भोग भोगावे लागतात म्हणून धर्मकार्य यशस्वी होण्यासाठी सर्वांनी नामजप वाढवूया. कोणतेही कार्य यशस्वी होण्यासाठी त्याला धर्माचे अधिष्ठान अत्यंत आवश्यक आहे, हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या उदाहरणातून आपल्याला लक्षात येते’, असे मार्गदर्शन सुनील घनवट यांनी केले. ते खोपोली येथील धर्मप्रेमींसाठी आयोजित केलेल्या बैठकीत बोलत होते. या बैठकीला २१ धर्मप्रेमी उपस्थित होते. बैठकीत सर्व धर्मप्रेमींना उत्साह आणि आनंद वाटत होता. त्यांची धर्मकार्याविषयीची तळमळ जागृत झाली. २ घंटे बैठक चालू असतांना कुणालाच जागेवरून उठावेसे वाटत नव्हते. |
राष्ट्र आणि धर्म विषयक ग्रंथांच्या प्रसारासाठी साहाय्य करीन ! – महेंद्र दळवी, आमदार, शिवसेना, अलीबाग
आमदार महेंद्र दळवी यांच्याशी संपर्क केल्यावर त्यांना विशाळगडावर धर्मांधांनी केलेल्या अतिक्रमणाविषयी सविस्तर माहिती देण्यात आली. ‘याविषयी मला काहीच माहिती नव्हते’, असे ते म्हणाले. ‘राष्ट्र आणि धर्म विषयक विविध ग्रंथांचा प्रसार होण्याच्या दृष्टीने मी निधीच्या संदर्भात साहाय्य करीन’, असेही त्यांनी सांगितले.
वैशिष्ट्यपूर्ण प्रतिसाद !१. रायगड जिल्ह्याचे अन्न आणि औषध नियंत्रण समितीचे सदस्य नितीन पावले म्हणाले, ‘‘मलासुद्धा याविषयी काहीच माहिती नव्हते. मी रायगड जिल्हा अन्न औषध नियंत्रण समितीची बैठक होणार आहे, त्या वेळी मी याविषयी विचारणार आहे. असे प्रमाणपत्र देण्याची अनुमती यांना कुणी दिली ? मी ‘ऑनलाईन’ सर्व माहिती गोळा करतो, आपण याला विरोध करायलाच हवा.’’ त्यांनी बैठकीतच कोणत्या संस्था ‘हलाल प्रमाणपत्र’ देतात, ते ऑनलाईन शोधले. २. या बैठकीला २ महिला उद्योजक उपस्थित होत्या. त्या म्हणाल्या, ‘‘आपण महिलांना हा विषय सांगा; कारण व्यापार्यांच्या महिलांनाही हा विषय कळायला हवा. आम्ही महिलांची विशेष बैठक आयोजित करतो.’’ |
‘हलाल प्रमाणपत्रा’च्या गंभीर परिणामांविषयी जागृती करणारी बैठक होण्यासाठी तळमळीने प्रयत्न करणारे अलीबाग येथील अधिवक्ता रवींद्र ओक !सुनील घनवट यांनी ‘हलाल प्रमाणपत्रा’मुळे समांतर अर्थव्यवस्था कशी निर्माण होत आहे ? याचे दूरगामी परिणाम हिंदुत्वनिष्ठ उद्योगपतींवर कसे होतील ? याविषयीचे गांभीर्य सांगितल्यावर अधिवक्ता रवींद्र ओक यांनी अनेक उद्योगपतींना स्वतः संपर्क केले आणि त्यांनी ‘आपण बैठक घेऊया’ असे सांगितले. या बैठकीचा प्रसार स्वतः अधिवक्ता ओक करत होते. ‘बैठक व्हावी’, अशी त्यांची तळमळ होती. त्यानंतर तेथील एका उद्योगपतींनी अलीबाग येथील बैठकीसाठी जागा उपलब्ध करून दिली. |