Menu Close

‘लव्ह जिहाद’ आणि धर्मांधांनी हिंदु महिलांवर केलेले अत्याचार या घटनांच्या बातम्या

रियाझने नग्न छायाचित्रांच्या माध्यमातून पीडितेला केले ‘ब्लॅकमेल’ !

धर्मांधाचा हिंदु युवतीवर बलात्कार आणि तिचे बलपूर्वक धर्मांतर

‘लव्ह जिहाद’विरोधी कायदे करूनही अशा प्रकरणांना आळा बसत नसेल, तर हिंदूंनी त्यांचे वेगळे न्यायालय स्थापन करून अशा जिहाद्यांना शिक्षा करण्याची वेळ आली आहे, असे वाटल्यास आश्चर्य काय ? – संपादक दैनिक सनातन प्रभात

(प्रतिकात्मक छायाचित्र)

कर्णावती (अहमदाबाद) – शहरातील नारनपुरा भागात रहाणारी १८ वर्षीय हिंदु युवती ‘इन्स्टाग्राम’ या सामाजिक माध्यमातून पालनपूरच्या रियाझ रफिक मेमन याच्या संपर्कात आली. दोघांमध्ये परिचय वाढल्यानंतर एक दिवस रियाजने तिच्यावर बलात्कार केला आणि तिला ‘ब्लॅकमेल’ करणे चालू केले. पीडिता १८ वर्षांची झाल्यावर रियाझने तिच्याशी ‘निकाह’ (लग्न) केला आणि मौलवीच्या उपस्थितीत तिचे धर्मांतर केले. या प्रकरणी पोलिसांनी विविध कलमे आणि ‘पॉक्सो’ कायद्याच्या अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

१. पोलिसांनी सांगितले की, नारनपुरा भागामध्ये १८ वर्षांची पीडिता कुटुंबियासह रहात असून ती एका वाणिज्य महाविद्यालयामध्ये शिकते. रफीक जुन्या गाड्यांची देवाण-घेवाणीचे काम करतो. त्याने पीडितेला ‘कबीर खान’ नावाने ‘फ्रेंड रिक्वेस्ट’ (मैत्री करण्याची विनंती) पाठवली होती.

२. माध्यमांच्या वृत्तानुसार रियाजने तिला हिमालय मॉलमध्ये भेटण्यास बोलावले आणि तिच्यावर बलात्कार केला. एवढेच नाही, तर त्याने तिच्याकडे तिची नग्न छायाचित्रे मागितली. मुलीने छायाचित्रे न दिल्याने रियाझने हातावर ब्लेड मारून तिला भावनात्मक ‘ब्लॅकमेल’ केले. भीतीपोटी तिने नग्न छायाचित्रे पाठवली. या छायाचित्रांच्या माध्यमातून तो तिला ब्लॅकमेल करू लागला. त्याने तिच्याकडे १० लाख रुपये आणि काही कागदपत्रे मागितली.

३. त्यानंतर रियाझने तिला राजस्थान येथे नेले. तेथे त्याने तिच्याशी बलपूर्वक न्यायालयीन विवाह केला आणि तिला बलपूर्वक इस्लाम स्वीकारायला लावला. पोलिसांनी  भ्रमणभाषचे ‘लोकेशन’  (ठिकाण) तपासून दोघांनाही शोधून काढले. त्यांना पळून जाण्यास साहाय्य करणार्‍यांचा शोध चालू आहे. रियाझने पीडितेशी ‘निकाह’ होईपर्यंत तो विवाहित असल्याचे लपवून ठेवले.


‘लव्ह जिहाद’च्या षड्यंत्रात सापडलेल्या मेरठ (उत्तरप्रदेश) येथील हिंदु तरुणीची केली सुटका !

आंतरराष्ट्रीय विश्व हिंदु परिषद आणि राष्ट्रीय बजरंग दल यांच्या कार्यकर्त्यांच्या तत्परतेचा परिणाम !

  • या घटनेविषयी काँग्रेस, साम्यवादी पक्ष, तसेच पुरो(अधो)गामी आणि निधर्मीवादी गप्प का आहेत ? – संपादक दैनिक सनातन प्रभात
  •  लव्ह जिहादच्या विळख्यातून हिंदु तरुणीची सुटका करणार्‍या हिंदुत्वनिष्ठांचे अभिनंदन ! – संपादक दैनिक सनातन प्रभात
(प्रतिकात्मक छायाचित्र)

नागपूर – ‘लव्ह जिहाद’च्या षड्यंत्रात सापडलेल्या एका हिंदु तरुणीची आंतरराष्ट्रीय विश्व हिंदु परिषद आणि राष्ट्रीय बजरंग दल या संघटनांतील कार्यकर्त्यांनी सुखरूप सुटका केली. मेरठ (उत्तरप्रदेश) येथून तिला नागपूर येथे आणण्यात आले. हिंदु तरुणीचा शुद्धीकरण विधी करवून तिला पुन्हा हिंदु धर्मात घेण्यात आले. त्यानंतर तिला तिच्या घरी पाठवले. (हिंदु धर्मातील मुलींचे अपहरण करून त्यांचे धर्मांतर आणि बळजोरीने विवाह करण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. ‘लव्ह जिहाद’च्या या घातक प्रकाराविषयी अनेक हिंदु मुलींचे पालक अनभिज्ञ आहेत. ‘लव्ह जिहाद’सारख्या विकृतीला बळी न पडण्यासाठी पालकांनी हिंदु मुलींना धर्मशिक्षण आणि स्वरक्षण प्रशिक्षण देणे ही काळाची आवश्यकता आहे. – संपादक) या सर्व घटनेत आंतरराष्ट्रीय विश्व हिंदु परिषदेचे प्रदेश मंत्री श्री. किशोर डिकोंडवार यांच्यासह सर्वश्री विलास पुणेकर, दिलीप चकोले, कौस्तुभ आवळे, सोनू तिवारी, गोविंदा शेट्टी आदींचे सहकार्य लाभले.

आंतरराष्ट्रीय विश्व हिंदु परिषदेचे प्रदेश मंत्री श्री. किशोर डिकोंडवार म्हणाले…

१. इयत्ता १२ वीत शिकणार्‍या हिंदु तरुणीची रुख्साना पठाण या मैत्रिणीच्या माध्यमातून मेरठ येथील साबीरशी ओळख झाली. त्याने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले आणि मेरठ येथे दूरभाष करून स्वतःच्या आईशी तिची ओळख करून दिली.

२. साबीरच्या आईच्या सांगण्यानुसार अनुमाने ५ मासांपूर्वी ती साबीरसमवेत निघून गेली. साबीरने तिला उत्तरप्रदेशातील नोएडा येथे नेले. तेथे काही मास वास्तव्य करून तो तिला घेऊन मेरठ येथे गेला. तेथील एका मशिदीत तिचे धर्मांतर करून ‘आफिया’ असे नाव ठेवले. यानंतर साबीरने तिच्याशी विवाह केला.

३. विवाहानंतर काही दिवसांतच साबीर आणि त्याचे कुटुंबीय यांचे खरे स्वरूप तरुणीला समजले. तिने नागपूर येथे स्वतःच्या आई-वडिलांना दूरभाष करून सत्य परिस्थिती सांगितली, तसेच यातून सोडवण्याची विनंती केली.

४. तरुणीच्या पालकांनी आंतरराष्ट्रीय विश्व हिंदु परिषदेच्या पदाधिकार्‍यांकडे साहाय्य मागितले. आंतरराष्ट्रीय विश्व हिंदु परिषद आणि राष्ट्रीय बजरंग दल यांचे कार्यकर्ते मेरठ येथे पोचले. त्यांनी तेथील स्थानिक कार्यकर्त्यांच्या साहाय्याने मुसलमान वस्तीतून तरुणीची सुटका केली आणि तिला नागपूर येथे सुखरूप परत आणले.


सुलेमानने ‘गुड्डू’ नावाने हिंदु अल्पवयीन मुलीला फसवून लग्न केले !

बांका (बिहार) येथे‘लव्ह जिहाद’ !

धर्मांध खोट्या हिंदु नावाने मुलींना फसवून त्यांच्याशी लग्न करत असतांना त्यांना प्रेम समजणार्‍या आधुनिकतावाद्यांना हा ‘लव्ह जिहाद’ दिसत नाही कि ते सोयिस्करपणे डोळे मिटून घेतात ? – संपादक दैनिक सनातन प्रभात

(प्रतिकात्मक छायाचित्र)

बांका (बिहार) – बांका येथे सुलेमान खान याने ‘गुड्डू’ बनून एका अल्पवयीन हिंदु मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्यानंतर तिला घरून पळून जाण्यास बाध्य केले आणि तिच्याशी लग्न केले. पीडितेच्या नातेवाइकांनी तक्रार केल्यावर पोलिसांनी सुलेमान आणि पीडिता यांना कह्यात घेतले.

१. बांकामधील बेलहर पोलीस ठाण्याच्या क्षेत्रातील एका गावामध्ये पीडितेचे कुटुंबीय रहातात. झारखंडच्या सुलेमान खान याने फेसबूकवर ‘गुड्डू’ नावाने खाते बनवले. अनुमाने ६ मासांपूर्वी त्याने पीडितेला ‘फ्रेंड रिक्वेस्ट’ (मैत्री करण्याची विनंती) पाठवली. पीडितेने सुलेमानला गुड्डू समजून त्याच्या मैत्रीची विनंती स्वीकारली. त्यानंतर दोघांमध्ये झालेल्या ‘चॅटिंग’च्या (संदेशांच्या देवाण-घेवाणीतून) माध्यमातून त्याने पीडितेला प्रेमाच्या जाळ्यात ओढले.

२. पीडित मुलगी सुलेमानच्या जाळ्यात अडकल्यावर त्याने पीडितेला घरून पळून जाण्यास बाध्य केले. त्यानंतर तिला झारखंडच्या देवघरजवळील जसीडीह येथे येण्यास सांगितले. यानंतर पीडित मुलीने घरून पलायन करून सुलेमानने सांगितलेल्या ठिकाणी जाऊन पुढे ते दोघेही धनबादच्या कोयलानगर येथे गेले. तेथे साईमंदिराच्या बाहेर दोघांनी लग्न केले.

३. लग्न झाल्यानंतर सुलेमान पीडितेला घेऊन त्याच्या मित्राकडे घेऊन गेला. मुलगी सापडत नसल्यामुळे तिच्या नातेवाइकांनी पोलीस तक्रार प्रविष्ट केली. पीडित मुलगी तिच्यासमवेत भ्रमणभाष घेऊन गेल्याने त्या आधारावर पोलिसांनी तिचे ‘लोकेशन’ (ठिकाण) शोधून काढले. त्यानंतर पोलिसांनी मुलीला धनबादच्या सरायठेला येथील कुसुम विहारच्या ‘ब्लेसिंग अँड होप’ पिपराबेडा येथून कह्यात घेतले.

४. पीडितेने पोलिसांना सांगितले की, सुलेमान याने तिला बेलहर येथून त्याच्या समवेत नेले आणि धनबाद येथे एका घरी ठेवले होते. त्यानंतर पोलिसांनी सुलेमानलाही कह्यात घेतले. तो धनबादच्या कुसुम विहारच्या पिपराबेडा येथील रहाणारा आहे.


अल्पवयीन दलित मुलीवरील बलात्कार प्रकरणातील आरोपी महंमद मेजरला अटक !

अशा वासनांध धर्मांधांना फाशीच द्यायला हवी ! – संपादक दैनिक सनातन प्रभात

(प्रतिकात्मक छायाचित्र)

अररिया (बिहार) – ६ वर्षांच्या एका दलित मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार केल्याप्रकरणी पोलिसांनी महंमद मेजर याला देहलीतील चांदणी चौक येथे अटक केली आहे.

१. माध्यमांशी बोलतांना पोलीस अधीक्षक हृदकांत यांनी सांगितले की, मुलीवर बलात्कार केल्यानंतर आरोपी पसार झाला होता. आम्हाला तो देहलीत असल्याची माहिती मिळाली होती. आम्हाला मिळालेल्या माहितीप्रमाणे तो नेपाळला जाण्याच्या विचारात होता.

२. माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार अररियाच्या दलित वस्तीतून महंमद मेजर याने पीडित कुटुंबातील एका ६ वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण केले. त्यानंतर त्याने शेतात नेऊन तिच्यावर बलात्कार केला. तो पीडितेच्या कुटुंबालाही धमकी द्यायचा.

३. पीडित कुटुंबाच्या समर्थनार्थ बजरंग दलाने आक्रोश मोर्चा काढला होता. आरोपीला अटक होण्यास विलंब होत असल्याने बजरंग दलाने संपूर्ण जिल्ह्याचा ‘चक्का जाम’ (चाकबंद आंदोलन) करण्याची घोषणा केली होती, तसेच आरोपीला फाशी देण्याचीही मागणी केली होती.


दरभंगा (बिहार) जिल्ह्यात धर्मांधांनी केले दोन हिंदु मुलींचे अपहरण आणि धर्मांतर !

(प्रतिकात्मक छायाचित्र)

दरभंगा (बिहार) – सिंहवाडा पोलीस ठाण्याच्या क्षेत्रामध्ये दोन चुलत बहिणींचे अपहरण करून त्यांचे धर्मांतर केल्याची घटना घडली. या प्रकरणी महंमद गालिब आणि महंमद शाहिद यांना अटक करण्यात आली आहे. या दोन्ही मुलींना कह्यात घेण्यात आले असून त्यांना न्यायिक संरक्षणामध्ये ठेवण्यात आले आहे. (१०० कोटी हिंदूंच्या देशात त्यांच्या मुली सुरक्षित नसतील, तर ‘हा देश हिंदु राष्ट्र होण्याखेरीज अन्य पर्याय नाही’, हे लक्षात घेऊन सर्वत्रच्या हिंदूंनी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी संघटित झाले पाहिजे ! – संपादक दैनिक सनातन प्रभात)

१. माध्यमांच्या माहितीनुसार हयातपूर येथील महंमद गालिब आणि महंमद शाहिद यांनी दोन चुलत बहिणींचे अपहरण केले होते. तक्रारीप्रमाणे पीडित मुली शिलाईकाम शिकत होत्या. त्यांचे रस्त्यातूनच अपहरण करण्यात आले होते. या प्रकरणी पीडितेच्या आईने पोलीस तक्रार प्रविष्ट केली होती.

२. बजरंग दलाचे जिल्हा संयोजक राजीव मधुकर यांनी हा ‘लव्ह जिहाद’चा प्रकार असल्याचे म्हटले आहे. ८ दिवस झाल्यानंतरही मुली सापडल्या नाहीत. त्यामुळे हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी आंदोलन चालू केले. यानंतर एकूण प्रकरण वाढत असल्याचे पाहून पोलिसांनी दोन्ही मुलींना शोधून काढले.

३. पीडितेच्या आईने सांगितले, ‘‘आम्ही ब्राह्मण आहोत. माझ्या मुलीचे वय १९ वर्षे आहे. माझी मुलगी आणि तिची चुलत बहिण यांचे लग्न करून धर्मांतर करण्यात आले आहे. त्यांना आमच्या समवेत घेऊन जायचे आहे.’’ दुसर्‍या मुलीची आई म्हणाली, ‘‘माझ्या मुलीचे वय २० वर्षे असून ती आता मुसलमान झाली आहे. तिने परत हिंदु धर्म स्वीकारावा, असे आम्हाला वाटते. ती आतून घाबरलेली आहे.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *