Menu Close

पुणे येथे अवैधरित्या गोवंशियांच्या मांसाची वाहतूक करणार्‍यांवर बजरंग दलाच्या साहाय्याने पिंपरी पोलिसांची कारवाई !

गोवंशियांची हत्या गोवंश हत्याबंदी कायदा करूनही न थांबणे, हे पोलिसांना लज्जास्पद ! – संपादक दैनिक सनातन प्रभात

पुणे – येथील कोंढवा येथे गोवंशांची कत्तल करून ते मांस पिंपरी-चिंचवड येथे विक्रीसाठी आणलेल्या लोकांवर बजरंग दलाच्या साहाय्याने पिंपरी पोलिसांनी २ जानेवारी या दिवशी कारवाई केली आहे. ते मांस एका टेंपोतून पिंपरी-चिंचवड येथे आणले असल्याची माहिती बजरंग दलाच्या स्वयंसेवकांना मिळाली होती. या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याचे काम चालू असून पोलीस स्वतः तक्रारदार होणार आहेत. (मांस आणल्याची माहिती हिंदुत्वनिष्ठांनाच नेहमी का मिळते ? याचा विचार पोलीस करतील का ?  – संपादक दैनिक सनातन प्रभात)

पिंपरी येथील गांधीनगरमधील एका दुकानात अनुमाने २५० किलो गोमांस आढळले आहे, तर आनंदनगर, चिंचवड येथील एका दुकानातही अनुमाने २५० किलो गोमांस आढळले आहे. दोन्ही दुकानांमध्ये कोंढवा येथील एका व्यक्तीने हे गोमांस आणले होते.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *