बेंगळुरू (कर्नाटक) – राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने कर्नाटकमधून दीप्ती मारला उपाख्य मरियम या महिला जिहादी आतंकवाद्याला आतंकवादी संघटना इस्लामिक स्टेटशी संबंध असल्यावरून अटक केली आहे. ती मेंगळुरू जवळील मस्तीकट्टे गावामध्ये रहाते. कर्नाटकातील काँग्रेसचे माजी आमदार दिवंगत बी.एम्. इदिनब्बा यांची ती सून असून इदिनब्बा यांचा मुलगा बी.एम्. बाशा याची पत्नी आहे.
Karnataka: Ex-Congress MLA’s family member arrested for ISIS links, cousin had fled to Syria in 2016https://t.co/Fx2P0bfwb1
— OpIndia.com (@OpIndia_com) January 4, 2022
बाशा याच्या घरावर धाड टाकल्यावर तेथून काही आक्षेपार्ह कागदपत्रे जप्त करण्यात आली. ऑगस्ट २०२१ मध्ये याच घरावर धाड टाकून बाशा याचा पुतण्या अम्मार याला इस्लामिक स्टेटशी संबंध असल्यावरून अटक करण्यात आली होती. त्या वेळी मरियम हिची चौकशी करण्यात आली होती. आता तिच्या विरोधात ठोस पुरावे सापडल्याने तिला अटक करण्यात आली आहे. मरियम विवाहापूर्वी हिंदु होती. ती एका श्रीमंत घराण्यातील होती. मारीयम उर्फ दीप्ती मारला ही दुबईमध्ये शिक्षण घेत असतांना इस्लामिक स्टेटची महिला आतंकवादी अजमल हिच्या संपर्कात आली. अजमल ही माजी आमदार बी.एम्. इदिनब्बा यांच्या मुलीची मुलगी आहे. (इदिनब्बा यांच्या घरातील प्रत्येकाची चौकशी करून त्यांचे आतंकवादी संघटना किंवा जिहादी यांच्याशी संबंध आहेत का, याची सखोल चौकशी करणे आवश्यक ! – संपादक दैनिक सनातन प्रभात) दीप्ती नंतर इस्लामकडे आकर्षित झाली. नंतर तिने धर्मांतर करून इदिनब्बा यांचा मुलगा अनास अब्दुल रेहमान याच्याशी विवाह केला. (हिंदूंना धर्मशिक्षण नसल्याने त्यांना हिंदु धर्माचे महत्त्व आणि महनता समजत नाही. असे हिंदू अन्य धर्मियांच्या भूलथापांना बळी पडून आयुष्याची राखरांगोळी करून घेतात ! – संपादक दैनिक सनातन प्रभात)