Menu Close

ओडिशा सरकारकडून मदर तेरेसाच्या संस्थेला ७८ लाख ७६ सहस्र रुपयांचे साहाय्य

  • बिजू जनता दलच्या सरकारने किती हिंदु संस्थांना अशा प्रकारचे साहाय्य केले आहे ?
  • ख्रिस्ती संस्था सामाजिक कार्याच्या नावाखाली हिंदूंचे धर्मांतर करतात. त्यांना येशूचे भक्त बनवण्याचा प्रयत्न केला जातो. हे उघड असतांना अशा संस्थांना बहुसंख्य हिंदूंच्या करातून गोळा झालेला आणि हिंदूंनी अर्पण केलेला पैसा देणे, हा हिंदूंचा विश्‍वासघात आहे. याचा हिंदूंनी वैध मार्गाने विरोध केले पाहिजे !

ओडिशाचे मुख्यमंत्री आणि बीजू जनता दलचे अध्यक्ष नवीन पटनायक

भुवनेश्‍वर (ओडिशा) – ओडिशाचे मुख्यमंत्री आणि बीजू जनता दलचे अध्यक्ष नवीन पटनायक यांनी मदर तेरेसा यांनी स्थापन केलेल्या ‘मिशनरीज ऑफ चॅरिटी’कडून संचालित करण्यात येणार्‍या १३ संस्थांना मुख्यमंत्री साहाय्य कोषातून आर्थिक साहाय्य करतांना ७८ लाख ७६ सहस्र रुपये दिले आहेत. या संस्था राज्यातील ८ जिल्ह्यांमध्ये कार्यरत आहेत. या निर्णयामुळे ९०० हून अधिक कुष्ठरोगी, तसेच काही अनाथालये यांना लाभ होणार आहे, असे सांगण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वीच ‘मिशनरीज ऑफ चॅरिटी’ संस्थेला परदेशातील निधी घेण्याविषयीच्या परवान्याचे नूतनीकरण करण्यास केंद्र सरकारने नकार दिला होता.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *