Menu Close

जालंधर (पंजाब) येथील शिवमंदिरात चोरट्यांनी चांदी चोरण्यासाठी शिवलिंग फोडले !

४ मासांत या मंदिरात दुसर्‍यांचा चोरी !

  •  पंजाबमध्ये काँग्रेसचे हिंदुद्वेषी सरकार सत्तेवर असल्यामुळे हिंदूंच्या मंदिरांवर, तसेच शिखांच्या गुरुद्वारांवर अशा प्रकारचे आघात झाल्यास आश्‍चर्य ते काय ? अशा सरकारला जनतेने निवडणुकीत धडा शिकवणे आवश्यक ! – संपादक दैनिक सनातन प्रभात
  • हिंदु धर्मावरील आघात रोखण्यासाठी हिंदूंचे परिणामकारक संघटन आवश्यक ! – संपादक दैनिक सनातन प्रभात
चोरट्यांनी चांदी चोरण्यासाठी शिवलिंग फोडले

जालंधर (पंजाब) – जालंधर कँट (छावणी) येथील रामबागमधील स्मशानात शिवमंदिर असून तेथील शिवलिंगावर चांदी बसवण्यात आली आहे. या चांदीची चोरी करण्याचा प्रयत्न अयशस्वी ठरल्याने चोरट्यांनी शिवलिंग फोडले आणि चांदी पळवली. या घटनेची माहिती मिळाल्यावर काही घंट्यांत नवे शिवलिंग स्थापन करण्यात आले; मात्र स्थानिकांनी चोरीच्या घटनेविषयी पोलिसांचा निषेध केला. तोडफोडीच्या घटनेचा माजी उपमुख्यमंत्री सुखबीर बादल यांनीही निषेध नोंदवला. तसेच येथे बंदचे आवाहन केले. ४ मासांपूर्वीही या शिवलिंगावर बसवण्यात आलेली ४ किलो चांदी चोरट्यांनी चोरून नेली होती. कदाचित् त्याच चोरट्यांनी ही चोरी केली असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. (४ मासांपूर्वी या प्रकरणाचे कसून अन्वेषण केले असते, तर पुन्हा चोरीची घटना घडलीच नसती ! – संपादक दैनिक सनातन प्रभात)

अमली पदार्थांचे सेवन करणार्‍यांवर कारवाई न करणारे निष्क्रीय पोलीस !

मंदिराचे व्यवस्थापक कुमार पप्पी यांनी आरोप केला की, रामबाग परिसरामध्ये अमली पदार्थांचे सेवन करणार्‍यांची संख्या मोठी आहे. येथे मोठ्या प्रमाणात दारूची विक्री केली जाते. याविषयी पोलिसांना सांगूनही कोणतीही करवाई झालेली नाही. पोलिसांच्या अशा निष्काळजीपणामुळेच चोरांचे फावते आहे.

वरील चित्र प्रसिद्ध करण्यामागे कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा हेतू नाही. माहितीसाठी हे चित्र प्रसिद्ध केले आहे. – संपादक दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *